महत्वाच्या बातम्या
-
पेंग्विन आणि कंगनाच्या खटल्यासाठी मुंबईकर कर भरतात | आता काय शिल्लक आहे
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत विरुद्धच्या खटल्यासाठी मुंबई महापालिकेने आतापर्यंत तब्बल 82 लाख 50 हजार रुपयांचा खर्च केला आहे. माहिती अधिकार कायद्यातंर्गत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावरुन आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सरकारवर टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई लोकल ट्रेन | मुंबईकरांसाठी राज्य सरकारकडून सकारात्मक संकेत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी बंद असलेली लोकल सेवा सुरु करण्याबाबत ठाकरे सरकारने संकेत दिले आहेत. लोकांची गर्दी पाहता लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र आता हळूहळू अनलॉक सुरु झालं असून चाकरमान्यांना कामावर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते, अत्यावश्यक सेवा वगळता इतर कर्मचाऱ्यांना लोकल बंद असल्याने रस्ते वाहतुकीवरही त्याचा परिणाम पाहायला मिळतो.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईत ड्रोनद्वारे हल्ला होण्याची शक्यता | मुंबई पोलिसांकडून महत्वाचा निर्णय
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता होण्याची शक्यता येत आहे. पुढील ३० दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्याची माहिती गुप्तहेर विभागाने दिली आहे. त्याचवेळी हा हल्ला ड्रोनद्वारे हा हल्ला होण्याची शक्यता असल्याने मुंबई शहरात ड्रोन उडविण्यावर पोलिसांनी बंदी घातली आहे.
5 वर्षांपूर्वी -
Go Corona Go नारा देणाऱ्या आठवलेंना कोरोनाची लागण
आरपीआयचे नेते रामदास आठवले यांना करोनाची बाधा झाली आहे. सध्या त्यांना करोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. खबरदारीचा उपाय म्हणून चार दिवस खासगी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. माझ्या संपर्कात जे लोक आले आहेत त्यांनी करोनाची चाचणी करुन घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे. करोनाची साथ नव्यानेच आली होती तेव्हा गो करोना करोना गो अशी घोषणा दिल्याने रामदास आठवले हे चांगलेच चर्चेत आले होते.
5 वर्षांपूर्वी -
TRP Scam | फॉरेन्सिक ऑडिट सुरू | रिपब्लिकच्या ५ गुंतवणूकदारांना समन्स
टीआरपी घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अभिषेक कोलवडेच्या चौकशीत, रिपब्लिक टीव्ही पाहण्यासाठी वाहिनीच्या मालक, चालकासह संबंधितांनी पैसे पुरविल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार त्यांना पाहिजे आरोपी म्हणून घोषित करत, त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. टीआरपी घोटाळ्यात रविवारी अभिषेक कोलवडे उर्फ अजित उर्फ अमित उर्फ महाडिक याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात करण्यात आलेली दहावी अटक आहे.
5 वर्षांपूर्वी -
नारायण राणेंना शिवसैनिकच योग्य वेळी उत्तर देतील – अशोक चव्हाण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कालच्या (२५ ऑक्टोबर) दसरा मेळाव्यात तुफान फटकेबाजी केली. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांचा खरपूस समाचार घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे हे सातत्याने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ‘बेडूक’ असा उल्लेख करत निशाणा साधला होता.
5 वर्षांपूर्वी -
भाषणात नवीन काहीच नव्हतं | केवळ जळफळाट | भाजपची दहशत पाहायला मिळाली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कालच्या (२५ ऑक्टोबर) दसरा मेळाव्यात तुफान फटकेबाजी केली. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांचा खरपूस समाचार घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे हे सातत्याने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ‘बेडूक’ असा उल्लेख करत भाजपवर देखील तिखट शब्दात निशाणा साधला होता.
5 वर्षांपूर्वी -
बाळासाहेबांकडे पाहूनच शांत | नाहीतर गेल्या 39 वर्षांतलं सेनेचं सगळं बाहेर काढेन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कालच्या (२५ ऑक्टोबर) दसरा मेळाव्यात तुफान फटकेबाजी केली. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांचा खरपूस समाचार घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे हे सातत्याने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ‘बेडूक’ असा उल्लेख करत निशाणा साधला होता.
5 वर्षांपूर्वी -
दिशा सालियनवर बलात्कार आणि मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री पुत्र आत जाणार - नारायण राणे
खासदार नारायण राणे यांनी यावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दसरा मेळाव्यातील भाषण म्हणजे कसलेही ताळतंत्र नसलेले निर्बुद्ध आणि शिवराळ बडबड होती. दिशा सालियनवर बलात्कार कोणी केले आणि कोणी मारले, हे लवकरच बाहेर येईल. त्यामध्ये एक मंत्री आत जाईल तो मुख्यमंत्री पूत्र आहे, असा थेट आरोप नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर केला.
5 वर्षांपूर्वी -
पायल घोषचा RPI'मध्ये प्रवेश | २०१४ मध्ये राखी सावंतने केला होता प्रवेश
दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात लैंगिक छळवणुकीची तक्रार केल्यामुळं चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री पायल घोष हिनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला आहे. आरपीआयचे अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत पायलनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा झेंडा हाती घेतला.
5 वर्षांपूर्वी -
रोहित पवारांनी सावरली फडणवीसांची बाजू | नेटकाऱ्याला म्हणाले असं बोलणं योग्य नव्हे
राज्याचे विरोधी पक्षनेते आणि बिहार विधानसभा निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना करोना झाल्याचं निदान झालं होतं. फडणवीस यांनी ट्विट करून याची माहिती दिली होती. गेल्या काही दिवसांपासून फडणवीस हे महाराष्ट्र व बिहार असा दोन्ही ठिकाणी फिरतीवर होते. बिहारमध्ये प्रचारामुळे ते सातत्यानं दौऱ्यावर होते. तर काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्यानं त्यांनी पाहणी केली होती.
5 वर्षांपूर्वी -
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण | ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. या आधी त्यांना लागण झाल्याची माहिती येत होती. मात्र, तेव्हा त्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्याची माहिती त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी दिली होती. ”माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन,”,अशी माहिती स्वतः अजित पवार यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
तुम्ही मुलींवर अत्याचार करणारा श्रावणबाळ जन्माला घातलाय का | आ. नितेश राणेंचा हल्लाबोल
शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यासह त्यांच्या दोन मुलांवर टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंची बेडकाशी तुलना केल्यानंतर राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. “तुम्ही काय नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा “श्रवणबाळ” जन्माला घातला आहे का?,” असा सवाल ठाकरे यांना केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
दसऱ्याच्या भाषणात ना धड हिंदुत्व | ना धड धर्मनिरपेक्षता | भाजपाचं टीकास्त्र
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दसऱ्यानिमित्त दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही शिवसैनिकांना संबोधित केले. मात्र, यावेळी कोरोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर ते दादर येथील सावरकर ऑडिटोरियममधून बोलत होते. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) जबरदस्त हल्ला चढवला. त्यांनी हिंदुत्व, कोरोना लस, बिहार निवडणूक, सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून भाजपवर निशाणा साधला. यानंतर आता भाजपनेही उद्धव ठाकरेंवर पलटवर केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
घाणेरडं राजकारण करून मिळवलेल्या खुर्चीसाठी तुम्ही पात्र नाही | पुन्हा मुख्यमंत्री लक्ष
मुख्यमंत्रिपदाचा मास्क बाजूला ठेवून भाषण करतोय, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात भाजप, मोदी सरकार, कंगना राणौत, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा समाचार घेतला. घरी खायला मिळत नाही, मुंबईत यायचं आणि मुंबईशी नमकहरामी करायची, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्र्यांनी कंगनावर केली. मुख्यमंत्र्यांच्या टीकेला आता कंगनानं प्रत्युत्तर दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
आरोपींची धक्कादायक माहिती | रिपब्लिकसहित या वाहिन्यांच्या मालकांकडून पैसे मिळाले
मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळ्यात अटक केलेल्या आरोपींकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. रिपब्लिक टीव्ही, महा मुव्हीज आणि न्यूज नेशन या तीन वाहिन्यांच्या चालक आणि मालकांकडून पैसे मिळाल्याचे त्यांनी सांगितले. आरोपींनी थेट चालक आणि मालकांची नावे घेतल्याने पोलिसांनी त्यांना ‘पाहिजे आरोपी’ केले आहे. यामुळे या वाहिन्यांच्या अडचणींत आणखी भर पडली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आणि पेंग्विन महा सरकार | हे दोन व्हायरस निष्पाप लोकांवर कधीही....
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा ट्विट करत शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. करोना विषाणू आणि पेंग्विन महा सरकार विषाणू कधीही निष्पाप लोकांवर ग्रासतील हे सांगता येत नाही, असं ट्विट करत अमृता फडणवीस यांनी टोला लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई महापालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार - संजय राऊत
करोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये न होता सभागृहात होणार आहे. यंदाच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याबाबत सगळीकडेच चर्चा आहे. तर, विरोधी पक्ष असलेला भाजपला लक्ष्य करणार का, असंही विचारलं जातं आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मागच्या दसऱ्या मेळाव्याला बोलत होतो | मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार - संजय राऊत
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला यंदा अनन्यसाधारण महत्व आहे. कारण यावर्षी फक्त शिवसेना पक्षप्रमुख नाही तर शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडणार आहे, असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेळावा घेत आहात, जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा अशी टीका विरोधकांनी केली आहे. त्याला जोरदार प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी जनाची आणि मनाची बाळगूनच दसरा मेळावा शिवतीर्थावर नाही तर सभागृहात घेत असल्याचं म्हटलंय. बिहार निवडणूक प्रचारात भाजप ५० हजार लाखाचे मेळावे घेत आहे त्याचं काय? असा सवालही यावेळी संजय राऊत यांनी विचारला आहे.
5 वर्षांपूर्वी -
चर्चा तर होणारच | शरद पवार, राज ठाकरे, संजय राऊत आज एका मंचावर?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊ आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातले तीन दिग्गज एकाच मंचावर येणार आहेत. प्रख्यात लेखक अंबरिश मिश्र यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी हे तीन दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे कारण या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी या तिन्ही नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. ‘चौकात उधळले मोती’ या अंबरीश मिश्र यांनी लिहिलेल्या पुस्तकांचं प्रकाशन मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणार आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊ आणि राज ठाकरे यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL