महत्वाच्या बातम्या
-
मुंबईत महिला असुरक्षित; नाईट नाईफ निर्णयावेळी सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले होते
माटुंगा रेल्वे स्थानकावर महिलांची छेडछाड काढत विनयभंग करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र महिलांनी कोणतीही तक्रार दाखल न केल्याने फक्त चोरीचा गुन्हा दाखल होत या विकृताची सुटका होण्याची शक्यता आहे. हा व्यक्ती रेल्वे स्थानकावर महिलांना स्पर्श करताना सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे. इतकंच नाही तर तो हस्तमैथून देखील करत होता. दोन महिलांना पोलिसांना यासंबंधी माहिती दिली. पण त्यांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिला. रजिऊर खान असं या विकृताचं नाव आहे.
5 वर्षांपूर्वी -
दिल्ली: जे कार्ड राज्यात चाललं नाही ते दिल्लीत काय चालणार? राष्ट्रवादीकडून खिल्ली
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्यात असून, राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील अनेक नेते दिल्लीत ठाण मांडून आहे. तर याच मुद्यावरून राष्ट्रवादीने भाजपवर निशाणा साधला आहे. राज्यात चाललं नाही ‘ते’ दिल्लीत काय चालणार, असा खोचक टोला राष्ट्रवादीने भाजपला लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
विश्व हिंदू महासभा अध्यक्ष रणजीत बच्चन हत्या प्रकरणी मुंबईतून एकाला अटक
विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजीत बच्चन यांची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना गेल्या रविवारी सकाळी उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये घडली होती. रणजीत बच्चन हे हजरतगंज भागातून मॉर्निंग वॉकला जात असताना मोटारसायकलवर आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेमुळे उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलेलं असताना या हत्येप्रकरणातील एका आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आलं असून पुढील धागेदोरे लवकरच पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
ठाकरेंची नवी पिढी; सत्तेमुळे आदित्य यांना अधिक संधी पण अमित यांच्यापुढे केवळ आव्हानं: सविस्तर वृत्त
ठाकरे घराण्यातील नवी आणि तरुण पिढी आता पूर्णपणे राजकारणात उतरली आहे. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे दोन्ही तरुण नेते आज सक्रिय राजकारणात आले असले तरी दोन्ही बाजूंचा विचार करता लोकांसमोर स्वतःला सिद्ध करण्याची सर्वाधिक संधी ही आदित्य ठाकरे यांनाच आहे आणि त्याचं मूळ कारण म्हणजे राज्याची आणि राज्यातील महत्वाच्या महानगर पालिकांची सत्ता आज शिवसेनेकडे आहे. त्यात स्वतः उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे स्वतः मंत्रिपदावर हेच कारण आहे.
5 वर्षांपूर्वी -
काँग्रेसच्या कार्यसमितीत CAA विरोधात ठराव; तर मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा; काँग्रेस नाराज
सध्या देशभर CAA वरून आंदोलनं पेटलेली असताना आणि काँग्रेससहित अनेक पक्ष त्या कायद्याला विरोध करत असताना शिवसेनेने वेगळी भूमिका घेतल्याचे काँग्रेस नाराज होण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा हा एकप्रकारे काँग्रेसला धक्का असल्याचं मानलं जातं आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेकडे काँग्रेस कसं पाहणार ते पाहावं लागणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
राम मंदिर उभारण्याच्या निर्णयानंतर मोदी सरकारचं राज ठाकरेंकडून अभिनंदन
अयोध्येत रामजन्मभूमीवर भव्य राम मंदिर बांधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आज एक अतिशय महत्त्वाची घोषणा केली. अयोध्येत भव्य आणि दिव्य मंदिर बांधण्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या निर्देशानुसार एका ट्रस्टची स्थापना करण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. श्री रामजन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्ट असं त्या ट्रस्टचं नाव असून सर्व ६७ एकर जमीन या ट्रस्टला दिली जाणार आहे. त्याचबरोबर मशिद बांधण्यासाठी सुन्न वक्फ बोर्डाला ५ एकर जमीन देण्यासाठी कार्यवाही सुरु झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
'पा’दरे’ पावटेंच्या सल्ल्याची मनसेला गरज नाही; अमेय खोपकरांचा भाजपच्या बोलघेवड्यांना टोला
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि राम कदम यांच्यावर टीका केली आहे. “पा’दरे’ पावटेंच्या इशाऱ्यांना आपण अजिबातच भीक घालत नाही आणि त्यांच्या सल्ल्याची राज ठाकरे आणि आम्हांला काडीचीही गरज नाही”, असं अमेय खोपकर यांनी ट्वीट करत प्रवीण दरेकर आणि राम कदम यांच्यावल निशाणा साधला.
5 वर्षांपूर्वी -
घुसखोरांविरोधातल्या आंदोलनाचं श्रेय इतरांनी घेऊ नये; उद्धव ठाकरेंचा मनसेला टोला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या महाअधिवेशनात झेंडा बदलल्यानंतर पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात भूमिका जाहीर केली होती. आंदोलन छेडण्याचाही इशारा दिला होता. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना ९ फेब्रुवारीला मुंबईत मोर्चाही काढणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घुसखोरांच्या प्रश्नावर ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली.
5 वर्षांपूर्वी -
CAA समर्थन? CAA नागरीकत्व हिरावणारा नव्हे तर नागरिकत्व देणारा कायदा : मुख्यमंत्री
सध्या देशभर CAA वरून आंदोलनं पेटलेली असताना आणि काँग्रेससहित अनेक पक्ष त्या कायद्याला विरोध करत असताना शिवसेनेने वेगळी भूमिका घेतल्याचे काँग्रेस नाराज होण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा हा एकप्रकारे काँग्रेसला धक्का असल्याचं मानलं जातं आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेकडे काँग्रेस कसं पाहणार ते पाहावं लागणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
NRC केवळ मुस्लिम नव्हे तर हिंदुंच्याही मुळावर घाव घालणारा कायदा : मुख्यमंत्री
‘जिथे भारतीय जनता पक्षाची सत्ता नाही तिथे अस्थिरता निर्माण करायची, दंगेधोपे घडवायचे आणि राज्य उलथून टाकायचे याला हे लोक हिंदुत्व म्हणतात का’, असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या हिंदुत्त्वावर जोरदार प्रहार केले. हे हिंदुत्व नसेल तर मी कुणापासून फारकत घेतली. हे माझे समविचारी आहेत काय? धर्माची होळी पेटवून सत्ता मिळवणं हे माझं हिंदुत्व नाही, अजिबात नाही. हे हिंदुराष्ट्र मी मानणार नाही.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई पालिकेचा २०-२१'चा अर्थसंकल्प ३३,४३४.५० कोटीचा; राखीव निधीतून ४३८० कोटीचं कर्ज घेणार
बंद झालेला जकात कर, मालमत्ता कराच्या वसुलीत झालेली घट आणि मंदीमुळे आटलेले विकास शुल्क आदी विविध कारणांमुळे देशातील श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेच्या महसुलात घट झाली असून या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी मंगळवारी मुंबई महापालिकेचा २०२०-२१ या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर करणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मला पटतय, आपल्याला पटतय ना ? तिथीचा हट्ट सोडा - अमोल मिटकरी
अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीची तारीख १९ फेब्रुवारी ही जाहीर करावी आणि तिथीचा हट्ट मुख्यमंत्र्यांनी सोडावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे. मला पटतय, आपल्याला पटतय ना..?, असं अशा आशयाचं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे. ट्विटसोबत त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. त्यावर तिथीचा हट्ट सोडा आणि १९ फेब्रुवारीलाच शिवजंयतीची तारीख जाहीर करा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांना केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
फोटोग्राफी तर माझा छंद आहे, तो मी सोडणार नाही: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा दुसरा भाग आज (मंगळवार) प्रसारित करण्यात आला. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर प्रकार टाकला आहे. शेतकरी कर्जमुक्ती, बुलेट ट्रेन, उद्योगधंदे, मराठवाड्यातील पाणीप्रश्न यावर त्यांनी भाष्य केले.
5 वर्षांपूर्वी -
कुणाल कामराने यापूर्वीच राज यांच्या मुलाखतीची इच्छा व्यक्त केली होती...पण - वाचा सविस्तर
कॉमेडियन कुणाल कामरा त्याच्या भूमिकांमुळे नेहमीच चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. यावेळी कुणाल कामरा थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी पोहचला. यावेळी त्याने राज ठाकरेंना थेट ‘लाच’ देऊ केली आहे. लाचेच्या स्वरुपात त्याने राज ठाकरेंना त्यांच्या आवडीचे मुंबईतील किर्ती कॉलेजजवळील ‘किर्तीचे वडे’ आणले. याबाबत त्याने स्वतः ट्विट करत याची माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
आम्ही गुजरात'मध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही; आव्हाडांचं शेलारांना प्रतिउत्तर
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला (CAA) पाठिंबा दर्शवला आहे की विरोध हे प्रोमोमध्ये स्पष्ट झालेलं नाही. तर, राष्ट्रीय नागरिक नोंदणीला (NRC) विरोध असल्याचं स्पष्ट दिसत आहे. तसेच एनआरसी महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेच्या मुखपत्रासाठी दिलेल्या मुलाखतीतून त्यांनी आपली भुमिका मांडली.
5 वर्षांपूर्वी -
CAA: हा कायदा केंद्राचा आहे, तुझ्या बापाचे राज्य आहे का? शेलारांची उद्धव ठाकरेंवर एकेरी शब्दात टीका
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला (CAA) पाठिंबा दर्शवला आहे की विरोध हे प्रोमोमध्ये स्पष्ट झालेलं नाही. तर, राष्ट्रीय नागरिक नोंदणीला (NRC) विरोध असल्याचं स्पष्ट दिसत आहे. तसेच एनआरसी महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेच्या मुखपत्रासाठी दिलेल्या मुलाखतीतून त्यांनी आपली भुमिका मांडली.
5 वर्षांपूर्वी -
हिंदुत्वात वचन पाळलं जातं, मोडलं जाणाऱ्या हिंदुत्वाला मी स्वीकारत नाही: मुख्यमंत्री
शिवसेनेच्या सामना या मुखपत्राला दिलेल्या विशेष पहिल्या मुलाखतीत मुख्यमंत्री बोलत होते. सामनाचे कार्यकारी संपादक, खासदार संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नांना ठाकरे उत्तरे देत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला विशेष मुलाखत दिली असून, त्यामध्ये त्यांनी सरकार स्थापनेच्या घडामोडीपासून वादग्रस्त नागरिकता कायद्यापर्यंत, राहुल गांधींपासून अजित पवारांपर्यंत प्रत्येक प्रश्नावर उत्तरे दिली आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा NRC'ला विरोध तर CAA बाबतीत संभ्रम कायम
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला (CAA) पाठिंबा दर्शवला आहे की विरोध हे प्रोमोमध्ये स्पष्ट झालेलं नाही. तर, राष्ट्रीय नागरिक नोंदणीला (NRC) विरोध असल्याचं स्पष्ट दिसत आहे. तसेच एनआरसी महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेच्या मुखपत्रासाठी दिलेल्या मुलाखतीतून त्यांनी आपली भुमिका मांडली.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईकरांना 24×7 तास पाणी देऊ अशी 'फेंकम फाक' करत 24×7 बार उघडे: आशिष शेलार
वांद्रे ते जोगेश्वरी विभागात मागील ३ दिवस पाणी नसल्यामुळे तेथील रहिवाशांच्या समस्या वाढू लागल्या आहेत. मेट्रोच्या कामामुळे वांद्रे ते जोगेश्वरी विभागात पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यामुळे येथे पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. असे असूनही अजून पालिकेने याची दखल घेतली नसून लोकांनी संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे पाणी नसल्याने लोकांनी थेट बिस्लरी बॉटलचे पाणी कपडे, भांडी आणि आंघोळीसाठी विकत घेतलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
९ तारखेच्या मोर्च्याच्या निमित्ताने मनसेच्या शहरनिहाय जोरदार बैठका
पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांविरोधात येत्या ९ फेब्रुवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबईत एक विराट मोर्चा काढत आहे. त्या मोर्च्या तयारीच्या निमित्ताने पक्षाच्या नेत्यांमार्फत पदाधिकाऱ्यांच्या शहरनिहाय नियोजन बैठकांचं सत्र सुरु आहे. मुंबई, पुणे आणि ठाण्यात पक्षातील वरिष्ठ नेते मंडळी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन ९ तारखेच्या कामाला लागले आहेत.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL