13 April 2021 8:13 PM
अँप डाउनलोड

मंत्रालयात पुन्हा एकदा तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; ६व्या मजल्यावरून उडी

मुंबई: मंत्रालयात पुन्हा एकदा एका तरुणानं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. परंतु, संरक्षण जाळीमुळे तरुणाचे प्राण वाचले आहेत. या घटनेमुळे मंत्रालयात मोठी धावपळ झाली होती. दरम्यान, अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिस यंत्रणेच्या मदतीने या तरुणाला सुरक्षितरित्या खाली उतरवलं.

BhagyaVivah Marathi Matrimonial

नशिबाने त्याचा जीव वाचला आहे, कारण त्याने मंत्रालयाच्या ६व्या मजल्यावरून उडी मारली होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडल्याचे वृत्त आहे. मंत्रालयातील तळमजल्यावरील पत्रकार कक्षात त्याने काही निवेदनी दिली आणि नंतर तो ६व्या मजल्यावर गेला अशी बातमी आहे.

दरम्यान, हा तरूण प्रजासत्ताक भारत पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे समोर वृत्त आहे. लक्ष्मण चव्हाण सदर तरुणाचे नाव असून, पोलीस पुढची चौकशी करत आहेत असे सांगण्यात आले.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x