15 December 2024 1:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

केवळ सध्याच्या नव्हे तर मागच्या फडणवीस सरकारने देखील अन्यायच केला - ज्येष्ठ IPS संजय पांडे

Senior IPS Sanjay Pandey, Sudden transfer, Mumbai Police

मुंबई, १८ मार्च: सचिन वाझे प्रकरणानंतर राज्यातील पोलीस दलात मोठे बदल करणाऱ्या ठाकरे सरकारसमोर एक नवा पेच उभा राहिला आहे. पोलीस दलातील या तडकाफडकी ‘अदलाबदली’मुळे वरिष्ठ अधिकारी संजय पांडे हे दुखावले गेले आहेत. परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी वर्णी लागल्याने संजय पांडे यांना तुलनेने कमी महत्त्वाच्या असणाऱ्या राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रमुखपदी नेमण्यात आले. या बदलीमुळे संजय पांडे प्रचंड नाराज आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे.

संजय पांडे हे १९८६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी वर्णी लागल्याने संजय पांडे यांना तुलनेने कमी महत्त्वाच्या असणाऱ्या राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रमुखपदी नेमण्यात आले. तसेच सेवा ज्येष्ठतेनुसार त्यांना अनेकदा साईड पोस्टिंग देऊन त्यांच्यावर अन्याय करण्यात आला असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच जानेवारी महिन्यात राज्याचे महासंचालक पद रिक्त झाले असून तेव्हा देखील त्यांना डावलण्यात आले.

पुढे संजय पांडे म्हणाले की, “माझ्याकडे कायम दुर्लक्ष केलं गेलं. मी केलेल्या चौकश्या थांबवण्यात आल्या. माझ्यापेक्षा कमी सेवा ज्येष्ठता असलेल्या अधिकाऱ्यांना त्यांच्यापेक्षा मोठ्या पदावर बसविण्यात आले असल्याची माहिती संजय पांडे यांनी दिली.

केवळ उद्धव ठाकरे सरकारच नाही, तर याआधीच्या फडणवीस सरकारने देखील आपल्यावर अन्यायच केला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी एएनआयशी बोलताना दिली आहे. या मुद्द्यावरून आता महाराष्ट्राच्या राजकीय विश्वामध्ये पुन्हा नव्याने आरोप-प्रत्यारोप सुरू होण्याची शक्यता असून मुंबईच्या पोलीस दलातील आत्तापर्यंत झाकलेली नाराजी चव्हाट्यावर येण्याचीही शक्यता आहे.

 

News English Summary: After the Sachin Waze case, the Thackeray government, which has made major changes in the police force in the state, is facing a new dilemma. Senior officer Sanjay Pandey is not happy due to the sudden transfer in the police force. As Parambir Singh became the head of the Home Guard, Sanjay Pandey was appointed as the head of the relatively less important State Security Corporation. Sanjay Pandey is very upset about this transfer. He has written a letter to Chief Minister Uddhav Thackeray expressing his displeasure.

News English Title: Senior officer Sanjay Pandey is not happy due to the sudden transfer in the police force news updates.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x