4 May 2025 4:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | आयटी शेअरबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा जाणून घ्या - NSE: INFY Trident Share Price | शेअर प्राईस केवळ 26 रुपये; यापूर्वी दिला 5230% परतावा; फायद्याची अपडेट आली - NSE: TRIDENT Motherson Sumi Wiring Price | 55 रुपयांचा शेअर फोकसमध्ये; पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: MSUMI IRB Share Price | तुमच्याकडे आहे का हा स्वस्त शेअर? गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, डाऊनसाइड टार्गेट - NSE: IRB Vodafone Idea Share Price | धमाल होणार, पेनी स्टॉक प्राईसवर होणार असा सकारात्मक परिणाम - NSE: IDEA IREDA Share Price | फक्त विचार करू नका, फायद्याचे निर्णय घ्या, हा शेअर ठरू शकतो फायद्याची गुंतवणूक - NSE: IREDA JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी स्टॉक, मोठी अपडेट, यापूर्वी 1927% परतावा दिला - NSE: JPPOWER
x

सेना खासदार राहुल शेवाळेंच्या पत्नी कामिनी यांना १ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा, उच्च न्यायालयात धाव

Shivsena, Rahul Shevale, Loksabhe Election 2019

मुंबई : शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांना सतरा अन्य आरोपींसह सत्र न्यायालयाने १ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत मतदानाच्यादिवशी चेंबूरमध्ये ट्रॉम्ब येथे गोंधळ घालण्याचा आणि मालमत्तेचे नुकसान केल्याचा त्यांच्यावर गंभीर आरोप होता. कामिनी शेवाळे या शिवसेनेच्या माजी नगरसेविका आहेत.

कर्तव्यावरील पोलिसाच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून मात्र कोर्टाने त्यांची सुटका केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला केल्या प्रकरणी कामिनी आणि अन्य शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. निवडणुकीदरम्यान स्थानिक मतदारांना प्रभावित करण्यासाठी गैरप्रकारे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करुन या मनसे पदाधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला होता. दरम्यान, या संघर्षामध्ये एक पोलीस कॉन्स्टेबल देखील गंभीर जखमी झाला होता.

न्यायाधीशांनी शिक्षा सुनावली त्यावेळी कामिनी शेवाळे कोर्टात हजर होत्या. त्यांचे पती राहुल शेवाळे सध्या दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेनेच्या तिकिटावर दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. कॉन्स्टेबल त्याच्यावर हल्ला करणाऱ्यांना ओळखू शकला नाही. त्यामुळे न्यायाधीशांनी या सर्वांची हत्येचा प्रयत्नाच्या आरोपातून मुक्तता केली. २४ एप्रिल २०१४ रोजी एकूण अठरा आरोपींविरोधात FIR दाखल करण्यात आला होता. यामध्ये १३ पुरुष आणि ५ महिला होत्या.

२०१४ लोकसभा निवडणुकीच्यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास कामिनी शेवाळे यांनी शिवसैनिकांना एक गाडी थांबवण्यास सांगितली होती. या गाडीमध्ये मतदारांना वाटण्याचे पैसे असल्याचा त्यांचा दावा होता. कामिनी यांच्या सांगण्यावरुन शिवसैनिकांनी त्या गाडीवर दगडफेक केली. कॉन्स्टेबल विकास ही गाडी तपासत असताना दगडफेकीत जखमी झाले होते. आरोपींनी शिक्षेविरोधात हाय कोर्टात दाद मागणार असल्याचे सांगितल्यामुळे शिक्षा तूर्तास स्थगित करण्यात आली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या