5 December 2024 12:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY NTPC Green Share Price | मालामाल करणार NTPC ग्रीन शेअर, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी - NSE: NTPCGREEN SIP Mutual Fund | ढीगभर पैसा जमा करायचा आहे मग, 'या' गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या नाहीतर सगळंच गमावून बसाल Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
x

रामदास आठवले हे अर्धे शटर बंद झालेलं दुकान | शिवसेनेचं टीकास्त्र

Minister Anil Parab, Ramdas Athavale, Kangana Ranaut, Marathi News ABP Maza

मुंबई, १४ सप्टेंबर : महाराष्ट्रात पोलिसांवर दबाव आणून चुकीचे कलम लावले जात आहे. गुंडागर्दी करणं शिवसेनेची जुनी सवय आहे आणि अशा परिस्थितीत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. त्यावरून शिवसेना प्रवक्ते अनिल परब यांनी रामदास आठवले यांची खिल्ली उडवली आहे. रामदास आठवले हे अर्धे शटर बंद झालेलं दुकान आहे, अशा शब्दांत अनिल परब यांनी आठवले यांचा समाचार घेतला.

शिवसेना नेते अनिल परब यांनी आज पत्रकार परिषदेत कंगनावर टीका केली. कंगनाला जर मुंबई पाकव्याप्त काश्मीर वाटत असेल तर तिनं योग्य वाटत असेल तिथं राहावं. मुंबईबद्दल वाईट बोलत असेल आम्ही ऐकून घेणार नाही. आपलं बस्तानं त्यांनी उचलावं हेच योग्य ठरेल. अशी टीका अनिल परब यांनी केली आहे.

अनिल परब यांनी पुढे म्हटलं की, ‘बेकादेशीर काम करणा-यांना राज्यपाल भेटत असत असतील, तर फक्त कंगनाला का भेटता ? बेकायदा बांधकामं तुटलेल्या सामान्य लोकांनाही भेटावं. तिचं बांधकाम तुटल्यावर इतका पोटशूळ का ?. मर्यादा दोन्ही बाजूंनी पाळाव्यात. कोणी काही बोलले, दैवताला बोलले असेल आणि सत्तेत बसलोय म्हणून आम्ही बोलायचं नाही का? बाळासाहेबांनी हे शिकवलं नाही.’

कंगनाची पर्सनॅलिटी स्प्लिस्ट पर्सनॅलिटी आहे. तिला डॉक्टरांची गरज आहे. हवंतर सेना डॉक्टरांची कुमक पाठवेल. अशा अनेक कंगना आल्या आणि गेल्या. कंगना अॅक्टर आहे, तिला जे स्क्रिप्ट दिलं जातंय, त्यानुसार ती बोलतेय अशी टीका देखील अनिल परब यांनी केली आहे.

 

News English Summary: Hooliganism is an old habit of Shiv Sena and in such a situation President’s rule should be implemented in Maharashtra, demanded Union Minister Ramdas Athavale. Shiv Sena spokesperson Anil Parab has ridiculed Ramdas Athavale. Ramdas Athavale is a shop with half shutters closed, said Anil Parab.

News English Title: Shivsena leader Minister Anil Parab criticized Ramdas Athavale about support to Kangana Ranaut for Mumbai issue Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x