3 May 2025 10:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

वर्षा राऊत ED कार्यालयात | शिवसैनिक ईडी कार्यालयाबाहेर जमले

Shivsena, ED Mumbai office, varsha raut

मुंबई, ४ जानेवारी: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत ईडी कार्यालयात हजर झाल्या आहेत. तीन तासांहून अधिक वेळ झाला तरी वर्षा राऊत ईडी कार्यालयात आहेत. वर्षा राऊत यांना ईडीकडून 5 जानेवारीला हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र, वर्षा राऊत एक दिवस अगोदर ईडी कार्यालयात हजर झाल्या आहेत. वर्षा राऊत यांना पीएमसी बँक प्रकरणी ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते.

दरम्यान, ईडी कार्यालयाबाहेर हळूहळू शिवसैनिकांनीही गर्दी करायला सुरुवात केली आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी ईडी कार्यालयाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला असून शिवसैनिकांना १४९ अंतर्गंत जमावबंदीची नोटिस देण्यात आली आहे.

वर्षा राऊत यांची चौकशी सुरु असतानाच शिवसैनिकांनी ईडी कार्यालयाबाहेर जमण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात जात असताना शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन करणार असल्याची चर्चा होती. वर्षा राऊत यांच्यासोबतच शिवसैनिकही ईडी कार्यालयात जाणार असल्याचं बोललं होतं. मात्र, संजय राऊत यांनी शिवसेना कोणत्याही शक्ती प्रदर्शन करणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं.

पीएमसी बँकेतील कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी वर्षा राऊत यांना 29 डिसेंबर रोजी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर वर्षा राऊत यांनी 5 जानेवारीपर्यंत मुदतवाढ मागितली होती. वर्षा राऊत यांना PMC बँकेतील खात्याशी संबंधित कागदपत्रं घेऊन कार्यालयात येण्यास सांगितलं आहे. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधवी राऊत आणि वर्षा राऊत यांच्यात झालेले आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर असल्याची माहिती आहे.

 

News English Summary: Shiv Sena MP Sanjay Raut’s wife Varsha Raut has appeared at the ED office. Although it has been more than three hours, Varsha Raut is in the ED office. Varsha Raut has appeared in the ED office a day earlier. Varsha Raut was summoned by the ED in the PMC Bank case. Meanwhile, Shiv Sainiks have also started crowding outside the ED office. Meanwhile, Mumbai Police has deployed a large police contingent outside the ED office and 149 notices have been issued to Shiv Sainiks.

News English Title: Shivsena party supporters started gathering outside ED Mumbai office news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या