हे काय? खासदार अदाणींच्या सौजन्याने वस्तू वाटप करतात | आमदारांचे अदाणी विरोधात मोर्चे

मुंबई, १३ ऑगस्ट : कोरोनाकाळात सर्वसामान्यांची आर्थिक गणिते कोलमडली असतानाच, अवाच्या सवा दराने आलेल्या वीज देयकांमुळे महावितरणविरोधात सध्या राज्यभर तीव्र नाराजी पसरली आहे. वाढीव वीज बिलाची चर्चा संपूर्ण राज्यात सुरु असून त्याबद्दल सरकार आणि वीज मंडळांविरोधात संतापाचं वातावरण आहे, कारण लाखो ग्राहकांना नेहमीपेक्षा तिप्पट बिल आलं आहे.
वाढीव वीज बिलाचा फटका फक्त सर्वसामान्यच नाही तर सेलिब्रेटींनाही बसत असल्याचं समोर आलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री तापसू पन्नूला तब्बल ३६ हजारांची वीज बिल आलं आहे. तापसीने ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती दिली असून संताप व्यक्त केला होता. “लॉकडाउनचे तीन महिने आणि कोणती नवी उपकरणं मी वापरली आहेत किंवा नव्याने विकत आणली आहेत ज्यामुळे मला इतकं वीजबिल आलं आहे. नेमकं कोणत्या वीजेचं शुल्क आकारत आहात?,” अशी संतप्त विचारणा तापसीने ट्विटच्या माध्यमातून केली होती. यावेळी तापसीने अदानी वीज कंपनीला टॅगही केलं होतं.
विशेष म्हणजे महावितरणने अव्वाच्या सव्वा वीज बिल पाठवल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी वसईमध्ये महावितरणवर चड्डी बनियन मोर्चा काढला होता. यावेळी त्यांनी लॉकडाऊनमुळे आमच्या अंगावर केवळ चड्डी बनियन उरलीय, तुमचे बील कुठून भरणार? असा सवाल महावितरणच्या अधिकाऱ्यांना केला होता. राज्यात शिवसेनेची सत्ता आणि स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील शिवसेनेचे मोर्चे काही संपलेले नाहीत.
आता मुंबईतील चांदिवली विधानसभा मतदार संघातील शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी अदानी पॉवर विरोधात मोर्चाचं आयोजन केलं आहे. तत्पूर्वी शिवसेनेचे मुंबईतील खासदार याच अदानी पॉवर समूहाच्या सौजन्याने लोकांमध्ये वस्तू वाटप करत असल्याचं समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे शिवसेना लोकांना मूर्ख समजून कशासाठी हा ढोंगीपणा करत आहेत असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
News English Summary: While the economic calculations of the common man have collapsed during the Corona period, there has been intense resentment against MSEDCL across the state due to the power bills coming at the rate of Rs. Discussions on the hike in electricity bills are going on across the state and there is an atmosphere of anger against the government and power boards
News English Title: Shivsena protest against Adani Electricity in Mumbai News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER