मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या राज्यव्यापी मेळाव्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली होती. त्याला आता राष्ट्रवादीने उत्तर दिलंय. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि फडणवीसांवर सडकून टीका केलीय. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सत्तेचा आजार झाला आहे, दिवसभर सत्तेत कसा येऊ याचा विचार करतात, रात्री स्वप्न पडतात अशी टीका त्यांनी केलीय. हिंमत असेल तर भारतीय जनता पक्षाने लोकसभेची निवडणूक घेऊन दाखवावी असं आव्हानही त्यांनी दिलं.

भारतीय जनता पक्षाची काळजी वाटते. त्यांनी चांगल्या डॉक्टरकडे जाऊन उपचार घ्यावे. देवेंद्र फडणवीस यांना इतकंच सांगू, हिंमत असेल तर त्यांनी आता लोकसभा निवडणूक घेऊन दाखवावी. दिल्लीत जशी भारतीय जनता पक्षाची विधानसभेला अवस्था झाली, तशीच देशात होईल, असं नवाब मलिक म्हणाले. आम्हाला निवडणुकांचं चॅलेंज देण्यापेक्षा मोदींना सांगून संसद बरखास्त करा. आम्ही लढू आणि जिंकू. तुम्ही जाऊन रुग्णालयात स्वत:चा उपचार करा. तुम्हाला जनतेने दिलेला कौल समजत नाही. ही महाविकासआघाडी २५ वर्ष काम करेल, असं दावाही नवाब मलिक यांनी केला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सर्व मंत्र्यासमवेत आज घेणार बैठक बोलावली आहे. वाय बी चव्हाण सेंटर इथे सकाळी ११ वाजता ही बैठक पार पडेल. महाविकास आघाडी सरकारच्या कारभार, निर्णय यावर होणार चर्चा होणार आह्. एल्गार परिषद तपास एनआयए देणे त्यास राष्ट्रवादीचा असेलेला विरोध, अल्पसंख्यक मुस्लिम समाज आरक्षण, तसच येणारे अर्थसंकल्प अधिवेशन यावर चर्चा या बैठकीत होणार असल्याची माहिती आहे.

 

Web Title: Story BJP needs a good doctor for better health treatment says Minister Nawab Malik.

हिंमत असेल तर भाजपने आता लोकसभा निवडणूक घेऊन दाखवावी: नवाब मलिक