11 May 2025 1:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्सबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: TATATECH Rama Steel Share Price | 9 रुपयांचा पेनी स्टॉक फोकस मध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: RAMASTEEL Infosys Share Price | IT शेअर मालामाल करणार; रॉकेट तेजीत होईल कमाई, स्वस्तात खरेदी करा - NSE: DATAPATTNS Data Patterns Share Price | रॉकेट तेजीत आहे हा शेअर, 4.35 टक्क्यांनी वाढला, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: DATAPATTNS BPCL Share Price | होय! तब्बल 44 टक्के परतावा देईल हा सरकारी कंपनीचा शेअर, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: BPCL National Pension Scheme | पगारदारांना महिना 1000 रुपये गुंतवणुकीतून प्रति महिना 1 लाख रुपये फिक्स पेन्शन मिळणार Gratuity Money Amount | तुमचा महिना पगार किती? खाजगी कंपनी नोकरदारांना ग्रॅच्युईटीचे 1,06,731 रुपये मिळणार
x

फक्त राज्यात कशाला? लोकसभा निवडणूक सुद्धा होऊन जाऊ द्या: शरद पवार

Sharad Pawar, Devendra Fadnavis

मुंबई: ‘हिम्मत असेल तर त्यांनी पुन्हा निवडणूक घेऊन दाखवावीच’, असे आव्हान देणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘फक्त राज्याची काय पूर्ण देशाचीच निवडणूक घ्या. आमची काहीच हरकत नाही.’, असा टोला शरद पवारांनी लगावला आहे. मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जळगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, असं आव्हान भाजपला दिलं होतं. त्यावर हिंमत असेल तर निवडणुका घ्या. जनता कोणाच्या बाजूनं आहे ते कळेल, असं फडणवीस म्हणाले होते. याबाबत शरद पवार यांना विचारलं असता त्यांनी फडणवीसांच्या आव्हानाची खिल्ली उडवली. ‘फक्त महाराष्ट्रातच कशाला? लोकसभेचीही निवडणूक घ्या. होऊन जाऊ द्या,’ असं पवार म्हणाले.

तत्पूर्वी, ‘हिंमत असेल तर, आमचं सरकार पाडून दाखवा’ असं खुलं आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिआव्हान दिलं होतं. ‘सरकार पाडण्याची आम्हाला गरज नाही. ते तसेही पडेल. पण हिंमत असेल तर पुन्हा जनादेशाला सामोरे जावून दाखवा. निवडणुका घ्या’, असं फडणवीस म्हणाले होते.

 

Web Title: Story NCP President Sharad Pawar challenges former CM Devendra Fadnavis face Loksabha Election again.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या