रुग्णालयातील बेड्सची माहिती मिळत नसल्याने कोरोनाबाधित त्रस्त...सविस्तर

मुंबई, २० मे : १९ मे रोजी वडाळ्यातल्या एका एसआरएच्या इमारतीत राहणारी व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आली. त्यानंतर त्या व्यक्तीला सोमय्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथे बेड उपलब्ध नव्हते. संबंधित रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात नेण्याऐवजी त्याला घरी सोडण्यात आलं. रुग्णाच्या शेजाऱ्यांनी क्वांरिटन करण्याच्या सूचनादेखील दिल्या गेल्या नाहीत. त्यांची कोणतीही चाचणी घेण्यात आली नाही. एखादी व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्यास किमान ती राहत असलेला मजला सील केला जावा, असं नियम सांगतो. मात्र पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एकही नियम पाळला नाही.
याबद्दल पालिका अधिकाऱ्याला विचारणा केली असता, रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्यानं रुग्णाच्या कुटुंबानं त्याला घरी आणल्याची माहिती त्यानं दिली. अधिकाऱ्यांनी इमारतीचा मजला का सील केला नाही, याबद्दल आपल्याला काहीच कल्पना नसल्याचं अधिकाऱ्यानं सांगितली. या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून पालिकेच्या कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
दुसरीकडे ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत मंगळवारी ही घटना घडली असुन अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णाचे नातेवाईक रुग्णाला घेवून ठाणे महानगरपालिकेच्या कळवा हॉस्पिटल मध्ये गेले होते. तेथे फक्त क्वारंटाइन कक्ष असल्याने रुग्णाला तिथे दाखल करून घेतले गेले नाही. तर रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल नसल्याने आणि फक्त पॉझिटिव्ह रुग्णांनाच सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करुन घेतले जात असल्याने त्या रुग्णाला सिव्हील हॉस्पिटलमध्ये देखील दाखल करून घेतले गेले नाही.
विशेष म्हणजे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनादेखील करोनाची लागण होत असून मुंबई पालिका मुख्यालयातील कर्मचारीही मोठय़ा प्रमाणावर बाधित झाल्याचे समजते. सुरक्षारक्षक, मालमत्ता विभाग, विकास नियोजन विभाग, अतिदक्षता विभागातील कर्मचारी बाधित झाले आहेत.
News English Summary: On May 19, a man living in an SRA building in Wadala was found coroned. The man was later rushed to Somaiya Hospital. But there were no beds available. Instead of taking the concerned patient to another hospital, he was released home.
News English Title: Suffering from coronary heart disease due to lack of information on hospital beds News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL