 
						Mutual Fund Scheme | कोटक महिंद्रा म्युच्युअल फंडाचा टॉप रेटेड इक्विटी म्युच्युअल फंड म्हणून प्रसिद्ध असलेला कोटक स्मॉलकॅप म्युचुअल फंड आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून देत आहे. 1 जानेवारी 2013 रोजी या म्युचुअल फंड योजनेची सुरुवात झाली होती. या म्युचुअल फंडाने SIP मध्ये दीर्घकालीन गुंतवणुक करणाऱ्या लोकांना बंपर परतावा मिळवून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ या म्युचुअल फंड योजनेचे उत्पन्न, उद्दिष्ट, पोर्टफोलिओ आणि इतर तपशील विस्ताराने.
Kotak Smallcap Mutual Fund Scheme :
ही एक मध्यम आकाराची ओपन इंडेड स्मॉल-कॅप म्युच्युअल फंड योजना असून यात कोणताही लॉक-इन कालावधी निश्चित करण्यात आलेला नाही. या योजनेच्या डायरेक्ट ग्रोथ प्लॅन अंतर्गत म्युचुअल फंडामध्ये 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत 8,614 कोटी रुपयांची व्यवस्थापन अंतर्गत मालमत्तेचा समावेश होतो. 14 नोव्हेंबर 2022 पर्यंत या म्युचुअल फंड योजनेचे निव्वळ मालमत्ता मूल्य 187.5090 रुपये होते. या म्युचुअल फंड योजनेचा बेंचमार्क निफ्टी स्मॉलकॅप-250 TRI हा आहे. व्हॅल्यू रिसर्च फर्म या म्युचुअल फंड योजनेला 4 स्टार रेटिंग दिले असून त्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. CRISIL सारख्या विश्वासू संस्थेने देखील या म्युचुअल फंड योजनेला 3 स्टार रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
म्युचुअल फंडाची गुंतवणूक :
कोटक स्मॉल कॅप म्युचुअल फंड हा मुख्यतः स्मॉल-कॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतो. या म्युचुअल फंड योजनेला 4 स्टार रेटिंग असून सेबीच्या जोखीम मापकानुसार या योजनेत खूप जास्त जोखीम आहे. हा म्युचुअल फंड प्रामुख्याने स्मॉल कॅप कंपन्यांच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करतो, आणि सोबत इक्विटी संबंधित सिक्युरिटीजच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओद्वारे भांडवल निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समधील संभाव्य वाढीचा फायदा घेण्यासाठी या म्युचुअल फंडात गुंतवणूक करणे फायद्याचे आहे.
गुंतवणुकीच्या रकमेचे तपशील :
या म्युचुअल फंड योजनेत एकरकमी गुंतवणुक करण्याची किमान रक्कम मर्यादा 5,000 रुपये आहे. तर या योजनेत SIP गुंतवणूकीची किमान रक्कम मर्यादा 1,000 रुपये आहे. या म्युचुअल फंडातून पैसे काढण्याची किमान रक्कम मर्यादा 1,000 रुपये आहे. या म्युचुअल फंडातील गुंतवणुकीच्या 10 टक्क्यांहून अधिक युनिट्सच्या रिडम्प्शनवर एक्झिट लोड म्हणून 1 टक्के शुल्क आकारला जातो. 30 सप्टेंबर 2022 पर्यंत या योजनेचे खर्चाचे प्रमाण 0.59 टक्के होते.
डायरेक्ट-ग्रोथ प्लॅन अंतर्गत लम्पसम रिटर्न :
या म्युचुअल फंड योजनेचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की याने मागील 3 आणि 5 वर्षांमध्ये एकरकमी गुंतवणुकीवर चांगले वार्षिक रिटर्न मिळवून दिले आहेत. तथापि, मागील 1 वर्षात या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना नकारात्मक परतावा मिळवून दिला आहे. स्थापनेपासून आतापर्यंत या म्युचुअल फंड योजनेतील गुंतवणुकीवर लोकांना सरासरी वार्षिक 20.19 टक्के परतावा मिळाला आहे, जो त्याच्या श्रेणीतील इतर म्युचुअल फंडाच्या तुलनेत कमी आहे. त्याच वेळी मागील 2 वर्षात या म्युचुअल फंडाने 40.63 टक्के, 3 वर्षात 33.93 टक्के, आणि 5 वर्षात 18.14 टक्के सरासरी वार्षिक परतावा कमावून दिला आहे.
SIP गुंतवणुकीवर परतावा :
या म्युचुअल फंडाने गेल्या 1 वर्षात लोकांना 5.91 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील 2 वर्षात सरासरी वार्षिक 19.31 टक्के, आणि 3 वर्षात 34.97 टक्के परतावा मिळवून दिला आहे. गेल्या 5 वर्षांत या म्युचुअल फंडाने SIP गुंतवणुकीवर 27.04 टक्के या दराने सरासरी वार्षिक परतावा कमावून दिला आहे. या फंडातील बहुतांश गुंतवणूक केलेली रक्कम ही इक्विटी शेअर्समध्ये गुंतवलेले आहे, जी एकूण फंडाच्या 94.35 टक्के आहे. आणि उर्वरित 5.65 टक्के रक्कम रोख आणि रोख समतुल्य साधनांमध्ये गुंतवली आहे. या म्युचुअल फंडाचे सरासरी बाजार भांडवल 11,462 कोटी रुपये आहे. फंडाने एकूण 75 कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे.
फंडाची गुंतवणूक :
हा म्युचुअल फंड प्रामुख्याने साहित्य, ग्राहक विवेकाधिकार, रसायने, धातू आणि खाणकाम, भांडवली वस्तू, सेवा, तंत्रज्ञान, वित्त सेवा, कापड उद्योग, ऑटोमोबाईल्स निर्मिती, आरोग्यसेवा सुविधा, बांधकाम उद्योग, ग्राहक स्टेपल आणि ऊर्जा निर्मिती या क्षेत्रात गुंतवणूक करतो. या म्युचुअल फंडाच्या टॉप 5 गुंतवणूक केलेल्या कंपन्या म्हणजे कार्बोरंडम युनिव्हर्सल, सेंच्युरी प्लायबोर्ड्स इंडिया, रत्नमणी मेटल अँड ट्यूब्स, गॅलेक्सी सर्फॅक्टंट्स आणि शीला फोम हे आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		