 
						Mutual Fund SIP | सध्या गुंतवणूक क्षेत्रात एसआयपी आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. AMFI च्या डाटानुसार म्युच्युअल फंडने दीर्घकाळात जास्तीत जास्त मोठी रक्कम मिळवून दिली आहे. म्युच्युअल फंड आणि एसआयपी या दोन्हीही शेअर बाजाराशी निगडित योजना असल्या तरीही यामध्ये जोखीम फार कमी प्रमाणात पाहायला मिळते.
त्यामुळे अनेकजण कोट्यधीश होण्यासाठी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू पाहतात. आज आम्ही या बातमीपत्रातून 5000 हजारांची एसआयपी करून तुम्ही 10 कोटींचे मालक कसे होणार याबद्दल माहिती सांगणार आहोत.
स्टेप-अप फॉर्मुला वापरून गुंतवणूक सुरू ठेवावी लागेल :
तुम्ही आतापर्यंत एसआयपी आणि म्युच्युअल फंडमध्ये दीर्घकाळाची गुंतवणूक केल्यानंतर कंपाऊंडचा देखील जास्तीत जास्त फायदा मिळतो. केवळ 5000 च्या एसआयपीमधून 10 कोटींचा निधी तयार करण्यासाठी तुम्हाला स्टेप अप फॉर्मुला वापरावा लागेल. स्टेप अप फॉर्मुला म्हणजे तुम्ही तुमची गुंतवणूक प्रत्येक वर्षाला वाढवाल. जेणेकरून 10 कोटींची रक्कम लवकरात लवकर तयार होईल.
10 कोटींचा फंड तयार होण्यासाठी किती वर्ष लागतील :
समजा एखाद्या व्यक्तीने एसआयपी म्युच्युअल फंडमध्ये 5000 ची गुंतवणूक सुरू केली आणि वार्षिक सरासरी परतावा 12% असेल तर, 10.19 कोटींचा फंड तयार करण्यासाठी तुम्हाला तब्बल 36 वर्षांचा काळ लागेल. लवकरात लवकर दहा कोटींचे मालक होण्यासाठी तुम्हाला स्टेप ऑफ फॉर्मुल्याप्रमाणे प्रत्येक वर्षी 10% योगदान वाढवावे लागेल.
35 वर्षांत 10.50 कोटी कसे तयार होतील :
समजा एखाद्या व्यक्ती 15% अनुमानीत रिटर्न घेत असेल आणि पाच हजारांची एसआयपी करत असेल तर, 35 वर्षांत एकूण 10.50 कोटी रुपये तयार होतील. या स्टेप-अप फॉर्मुल्यामध्ये तुम्हाला 10 नाही तर केवळ 5 टक्क्यांनी योगदान वाढवावे लागेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		