19 April 2024 3:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार? Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स सह हे तीन शेअर्स फायद्याचे ठरतील, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर 13 रुपयांवर आला, आता IIFL ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राइस केली जाहीर
x

सावरकरांना आदर्श न मानणारे आ. नितेश राणे संघ कार्यालयात? सर्व आमदारांचा अभ्यास वर्ग

BJP MLA Nitesh Rane, CM Devendra Fadnavis, RSS, Sarsanghachalak

नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून ‘शाळा’ घेतली जाणार आहे. हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात असलेले भारतीय जनता पक्षाचे दोन्ही सभागृहातील आमदार स्मृती भवनमधील संघ अभ्यास वर्गाला हजेरी लावणार आहेत. यामध्ये नितेश राणे, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक यासारख्या ‘आयात’ नेत्यांचाही समावेश आहे.

विधानसभा आणि विधानपरिषदेतील तब्बल ११४ आमदार या वर्गाला उपस्थित राहणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांचा अभ्यास वर्ग दरवर्षी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिरात आयोजित करण्यात येतो. त्यानुसार यंदाही सर्व आमदार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अभ्यासवर्गाला हजेरी लावत आहेत.

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सावरकर मुद्द्यावर घेतलेल्या भूमिकेवरुन शिवसेनेला सुनावले होते. फडणवीस यांनी महापुरुषांचा आदर करण्यासंदर्भात सौदेबाजी सुरु आहे का असा सवाल शिवसेनेला केला होत. यावरुन आता फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला होता. “आम्ही गांधी आणि नेहरूंना मानतो, म्हणून तुम्ही सावरकरांना माना?‬ ही कुठली सौदेबाजी आहे?‬,” असा सवाल फडणवीस यांनी शिवसेनाला केला होता.

कारण, वीर सावरकरांवर सडकून टीका करणारे आमदार नितेश राणे आता त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून सभागृहात महाविकास आघाडीला धारेवर धरणार आहेत आणि यापूर्वी देखील आमदार निलेश राणेंवर काँग्रेसने टीका करत भारतीय जनता पक्षाला खडे बोल सुनावत सावरकर प्रेम म्हणजे निव्वळ डोंगीपणा असल्याचं म्हटलं होतं. तसेच आ. नितेश राणे यांनी ४ डिसेंबर २०१५ मध्ये केलेल्या ट्विट मध्ये म्हटलं होतं की, ब्रिटिश साम्राजाची चार वेळा माफी मागणारे सावरकर तरुणांच्या कोणत्याही पिढीचे आदर्श होऊ शकत नाहीत.

 

Web Title:  BJP MLA Nitesh Rane to Present at RSS Smruti Bhawan.

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x