15 December 2024 7:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य मुखपत्र चक्क हिंदी-गुजरातीत? सविस्तर वृत्त

Gujarati Language, HIndi Language, Lokrajya

नागपूर: महाराष्ट्र शासन सरकारी कामकाजात १०० टक्के मराठीचा वापर करण्याच्या निर्णयाला केराची टोपली दाखवत आहे असाच प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. कारण, महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाच्या चक्क हिंदी, गुजराथी आणि उर्दू आवृत्तींच्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याच्या अंकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं आहे. यावेळी सचिव तथा महासंचालक सुरेश वांदिले देखील उपस्थित होते.

लोकराज्यच्या संबंधित अंकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शपथविधी, मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांचा परिचय आणि विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या २८८ विधानसभा सदस्यांचा थोडक्यात परिचय प्रसिद्ध करण्यात आले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या जीवनकार्यावर, विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे विशेष लेख तसेच गुरूनानक यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्त त्यांच्यावर विशेष लेखही प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

मात्र राज्य सरकारला स्वतःच्या राज्यभाषेचं काही पडलं आहे का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. कारण शासन स्वतःचेच निर्णय पायदळी तुडवून गरज नसताना गुजराती आणि हिंदीत देखील ते प्रकाशित करत आहेत. वास्तविक गुजरातच्या बडोद्या पासून ते थेट गुजरातच्या अनेक भागात आणि हिंदी मध्यप्रदेश पासून ते उत्तरेकडील राज्यांमध्ये मराठी लोकं पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असून देखील गुजरात सरकार किंवा इतर हिंदी भाषिक सरकारांना मराठीचा नेहमीच द्वेषच केला आहे.

महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे हे दाखविण्यासाठी इतर भाषांची घुसखोरी स्वतः राज्यसरकारच करत आहे. केवळ मोठ्या प्रमाणावर गुजराती आणि हिंदी भाषिक लोकं राज्यात राहतात, त्यांना खुश करण्याची करण्यात आलेला हा केविलवाणा प्रकार म्हणावा लागेल. राज्यभाषेचं जतन आणि प्रसार करण्यासाठी अनेक संस्था पुढाकार घेऊन काम करत आहेत, मात्र राज्य सरकार त्याउलट सर्वकाही करताना दिसत आहे. त्यामुळे इतरांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही, कारण स्वतः राज्य सरकारच गुजराती आणि हिंदी भाषेचं अतिक्रमण कायदेशीर स्वीकारत आहे असंच म्हणावं लागेल.

 

Web Title:  Maharashtra State Government Mukhapatra Lokrajya Published in Gujarati and Hindi Languages.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x