मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली चौथी यादी जाहीर केली आहे. यामध्ये पक्षाने मुक्ताईनगर मतदारसंघातून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं तिकीट कापत त्यांची कन्या रोहिनी खडसे यांना उमेदवारी दिली आहे. तिकीट कापलं जाणं हा एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

भाजपने चौथ्या यादीत ७ जागांची घोषणा केली आहे. यामध्येही एकनाथ खडसे यांच्यासह विनोद तावडे आणि प्रकाश मेहता यांना स्थान देण्यात आलेलं नाही. तर कुलाबामधून रामराजे निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर यांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे याच यादीत मनसेचे नाशिक’मधील पदाधिकारी अशोक ढिकले यांचा देखील समावेश असल्याने राज ठाकरे यांनी का टाळलं याचा प्रत्यय आला आहे.

मनसेच्या ३ याद्या जाहीर होऊन देखील त्यांचं नाव का नाही असे प्रश्न कार्यकर्ते उपस्थित करत होते. मात्र राज ठाकरे यांना ते आधीपासूनच उमेदवारीसाठी भाजपच्या संपर्कात असल्याची बातमी त्यांना भाजपामधीलच नेत्यांकडून कानावर आली होती. नाशिक’मधील अनेक पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत मागील महापालिका आयत्यावेळी दगाफटका केला होता. त्यामुळे अशा पदाधिकाऱ्यांना त्यांनी आधीच दूर ठेवल्याचे वृत्त आहे. त्यामुळे राहुल ढिकले यांच्याबाबतीत राज ठाकरे यांनी का असा निर्णय घेतला असावा याचं उत्तर मनसेच्या कार्यकर्त्यांना भाजपच्या चौथ्या यादीत मिळालं असावं अशी अशा मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी देखील अनेक पदाधिकारी पक्षासोबत आयत्यावेळी दगाफटका करण्याच्या तयारीत असल्याने त्यांना दूर ठेवून निष्ठावंतांना संधी देण्यात आली आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

भाजपची चौथी यादी, कुणाला मिळाली संधी?

मुक्ताईनगर – रोहिनी खडसे
काटोल – चरणसिंह ठाकूर
तुमसर – प्रदीप पडोले
नाशिक (पूर्व)- राहुल ढिकले
बोरिवली – सुनील राणे
घाटकोपर (पूर्वी) – पराग शाह
कुलाबा – राहुल नार्वेकर

मनसेचे राहुल ढिकले आधीपासूनच भाजपच्या संपर्कात होते हे चौथ्या यादीत सिद्ध झालं