मुंबई : स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी आणि त्यांच्या जयंतीदिनी म्हणजे २३ जानेवारीला शिवाजी पार्क येथील महापौर निवासस्थानी गणेशपूजन होणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, हा समारंभ लहान स्वरूपात होणार असल्याने दिल्लीतुन कोणालाही निमंत्रण आणेल. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या समारंभास विशेष उपस्थित राहतील, असे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर स्मारकाची घोषणा करण्यात आली होती. पण सत्ता येऊन देखील मागील ५-६ वर्षे ते काम रखडले होते. आता शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात आणि मुख्य म्हणजे भूमिगत स्वरूपात हे स्मारक केले जाईल. महापौर निवासाच्या वास्तूमध्ये सकाळी अकरा वाजता समारंभ होणार असल्याचे शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. परंतु, मुंबईच्या विकास आराखडय़ातील तरतुदीनुसार अजून एक परवानगी मिळालेली नाही, असे ते म्हणाले.

वास्तविक सत्ताकाळात देखील ज्या मोठ्या नेत्याला लाल दिव्याच्या गाडीत बसण्याचा मोह झाला नाही. मुंबई महापौरांच्या गाडीत बसने सुद्धा त्यांनी कधीच पसंत केले नाही. त्यामुळे नेहमीच जमिनीवर राहिलेल्या या नेत्याचे भूमिगत स्मारक करण्याची वेळ आज सत्ताधाऱ्यांच्या हट्टापायी आली आहे. नेहमीच हवेत वावरणारे सध्याचे सत्ताधारी स्वतःचे भव्य इमले जरी जमिनीवर उभे करत असले, तरी नेहमीच जमिनीवर राहिलेल्या स्वर्गीय. बाळासाहेबांचे स्मारक मात्र भूमिगत करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे हे अत्यंत खेदजनक आहे.

balasaheb thackerays smarak will be underground