कोंडागाव : ईव्हीएम मशीनमधील गडबडींची धास्ती छत्तीसगडच्या काँग्रेस उमेदवारांनी घेतल्याचे पहायला मिळत आहे. मागील निवडणुकीत ईव्हीएम’मध्ये भाजपने अनेक चुकीच्या गोष्टी संगनमताने केल्याचे आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आले आहेत. अनेक मतदारसंघात उमेदवारांना स्वतःचे मत सुद्धा न मिळाल्याने अनेकांनी शंका व्यक्त केली होती. त्यात धमतारी येथे ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉन्गरूम’मध्ये एका अनोळखी व्यक्तीला तहसीलदाराचं सोबत घेऊन गेल्याने काँग्रेसने रान उठवले होते. त्यानंतर सदर तहसीलदारांना निवडणूक आयोगाने सस्पेंड केले आहे.
परंतु, काँग्रेसच्या छत्तीसगडमधील उमेदवारांनी याची खूपच धास्ती घेतल्याचे पहायला मिळत आहे. कारण, छत्तीसगड मध्ये विधानसभेचं मतदान पूर्ण झालं असलं तरी, काँग्रेसचे उमेदवार ईव्हीएम मशीन ज्या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत त्या ठिकाणी तंबू ठोकून पोलिसांसोबत पाहारा देत असल्याचं समजतं. सादर उमेदवार कोणताही धोका पत्करण्यास तयार नसून आम्हाला भाजपवर जराही विश्वास नाही असं त्यांचं म्हणणं आहे.
दरम्यान, ही बातमी छत्तीसगडमधील केशकाल आणि कोंडागाव या विधानसभा क्षेत्रातील आहेत असं वृत्त आहे. त्यामुळे ईव्हीएम’च्या अफरातफरीची काँग्रेस उमेदवारांनी किती डस्टी घेतली आहे ते सिद्ध होत आहे. निकाल लागे पर्यंत ते इथून हलणार नसल्याचे समजते.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		