मुंबई, ०६ सप्टेंबर | प्रविण दरेकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यात चांगलंच शाब्दिक युद्ध रंगलं आहे. राजू शेट्टी हे बिनबुडाचा लोटा आहे, अशी जहरी टीका दरेकर यांनी केली होती. त्याला शेट्टी यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. प्रविण दरेकर कुणाची भाटगिरी करत आहेत?, असा सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे.
प्रविण दरेकर हे कुणाची भाटगिरी करत आहेत?, राजू शेट्टी यांनी झापलं – Former MP Raju Shetti slams BJP leader Pravin Darekar :
प्रविण दरेकर हे कुणाची भाटगिरी करत आहेत?
राजू शेट्टी आज मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी ही टीका केली. प्रविण दरेकर हे कुणाची भाटगिरी करत आहेत? गुजरातची की महाराष्ट्राची? असा सवाल करतानाच आम्ही आंदोलनाचं हत्यार खाली ठेवलं नाहीये. जर निर्णय झाला नाही तर आंदोलनावर ठामच राहीन असं शेट्टी यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांना शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी केलेल्या टीकेबाबत विचारण्यात आलं. त्यावेळी फालतू लोकांच्या टीकेला मी उत्तर देत नाही, अशी टीका त्यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी बोलावलं म्हणून आलो, महाराष्ट्रात कोकण, पश्चिम महाराष्ट्रात आलेला प्रचंड महापूर आणि नुकताच मराठवाड्यामध्ये पडलेल्या अतिवृष्टी संदर्भातल्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज मला या ठिकाणी निमंत्रित केलेले आहे. या बैठकीचे आयोजन सह्याद्रीमध्ये केले गेलं होतं. पूरग्रस्तांना भरीव मदत मिळण्याच्या मागणीसाठी काल मी आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देवून काल आंदोलन स्थगित करून आज बैठकीसाठी आलो, असं ते म्हणाले.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Former MP Raju Shetti slams BJP leader Pravin Darekar.
