पाकिस्तानची साखर, एपीएमसीतील व्यापार्यांना मनसेचा दम

नवी मुंबई : देशातील शेतकऱ्यांचे हित लक्षात न घेता मोदी सरकारने पाकिस्तानातून आयात केलेली साखर ही राज्यातील साखर उत्पादकांच आणि शेतकऱ्यांच आर्थिक दृष्ट्या कंबरडं मोडणारी असल्याने त्याची विक्री इथल्या व्यापाऱ्यांनी त्वरित थांबवावी, नाहीतर मनसे शेतकऱ्यांसाठी कायदा हातात घेईल असा थेट इशाराच कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापार्यांना दिला गेला आहे.
कारण देश भक्तीचे गोडवे गाणाऱ्या मोदी सरकारने महाराष्ट्रातील ऊस उत्पादक तसेच साखर कारखाने संकटात असताना लाखो मेट्रिक टन साखर पाकिस्तानमधून आयात केली आहे. पाकिस्तान मधून आयात केलेल्या साखरेचा भाव इथल्या बाजार भावापेक्षा १ रुपयाने कमी आहे. मागच्या हंगामातील जवळपास दोन ते अडीच लाख टन साखर पडून आहे आणि यंदा जवळपास ६० ते ६५ लाख टन इतकं अधिक साखरेचे उत्पादन झाले आहे. देशात आधीच इतका प्रचंड साखरेचा साठा पडून असताना केंद्राने पाकिस्तानमधून साखर आयात करण्याची काय गरज होती असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
यंदा झालेले साखरेचे प्रचंड उत्पादन पाहता साखरेचे हे दर आणखी खाली येण्याची दाट शक्यता आहे आणि त्यातच पाकिस्तानची साखर बाजारात दाखल झाल्याने साखरेचे दर आणखी खाली येण्याची शक्यता असल्याने हा प्रयोग म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्या सारखा आहे असा आरोप शेतकरी आणि साखर उत्पादक करत आहेत.
स्थानिक शेतकरी व साखर उत्पादक संकटात असताना पाकिस्तानातून साखर आयात करणाऱ्या आणि देशभक्तीचा आव आणणार्या मोदी सरकारला याची जाणीव नाही की काय ? की मागच्या २ वर्षात तुरडाळीचा घोळ करून या सरकारला या वर्षी साखर उद्योग अडचणीत आणून ऊस उत्पादक शेतकरी याचे कंबरडे मोडायचे आहे का ? असा सवाल मनसे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले यांनी विचारला आहे. पाकिस्तानमधील चिस्तीयन आणि लालूवल्ली सिंध या ब्रॅण्डची साखर नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाली असून या साखरेच्या गोणींवर पाकिस्तान शुगरचा शिक्का आहे.
देशातील आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातील शेतकरी सहकाराने व जिल्हा बँका आणि खाजगी सावकारांकडून कर्ज काढून ऊस उत्पादन करतो. पण भाजप सरकार पाकिस्तानातून स्वस्त साखर महाराष्ट्रात आयात करून शेतकर्यांवर अन्याय करतय आणि आपले बेगडी देशप्रेम दाखवत असल्याचे मनसेने म्हटले आहे. मोदी-फडणवीसांनी ही साखर घेऊन जाऊन आपल्या घरी चहा प्यावा. मात्र महाराष्ट्रातील जनता ही साखर घेणार नाही आणि कोणत्याही व्यापार्याने ही साखर विकण्याचा प्रयत्न केला तर त्याला मनसे आपल्या पद्धतीने उत्तर देईल असा इशारा मनसे उपशहर अध्यक्ष विनोद पार्टे यांनी दिला आहे. आम्ही लवकरच एपीएमसीतील सर्व व्यापार्यांना याबाबतचे पत्र देणार असल्याचे मनसेने म्हटले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर घसरतोय, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट - NSE: YESBANK
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON