मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आज सायंकाळी दादरमधील शिवाजी पार्क येथे ‘शिवाजी पार्क दीपोत्सव’ जल्लोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, भारतरत्न सचिन तेंडुलकर तसेच अंजली तेंडुलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

दीपावली हा रोषणाईचा, आनंदाचा सण असल्याने उत्साही वातावरण निर्माण व्हावे यासाठी ‘शिवाजी पार्क दीपोत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, फटाक्यांची आतिषबाजी तसेच रोषणाईच्या झगमटाने संपूर्ण शिवाजी पार्क परिसर उजळून निघाला होता. यामुळे पार्कासह आजूबाजूचा परिसर सुद्धा उत्साही वातावरणामुळे उजळून निघाला होता. यावेळी शिवाजी पार्कात कंदिलांची सुद्धा मोठ्याप्रमाणावर सजावट करण्यात आली आहे. आज सायंकाळी पार पडलेल्या या कायरकर्मवेळी राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे आणि मनसेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

mns organised dipposatav at dadar shivaji park area for diwali