1 May 2025 6:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

फडणवीस साहेब! आमच्या चड्ड्यांची काळजी सोडा, तुमच्या चड्ड्यांचा वापर मतदाराने सुरु केला आहे

Devendra Fadanvis, Tulsi Joshi, MNS, BJP

पालघर : काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर कोल्हापूर येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोचऱ्या शब्दांत टीका केली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर टीका केल्यानंतर आता मनसेचे कार्यकर्ते आणि कट्टर राज ठाकरे समर्थक तुलसी जोशी यांनी सुद्धा फडणवीसांच्या बोचऱ्या टीकेला जशास तसे उत्तर दिले आहे.

महायुतीची रविवारी कोल्हापुरात सभा झाली. या सभेत मुख्य़मंत्र्यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत तुमचे सगळे कपडे आम्ही उतरविल्याचे म्हटले होते. मुख्यमंत्री म्हणाले होते, की आमचे कपडे उतरविणारा जन्माला यायचा आहे. काही जण स्वतः बोलू शकत नाही, त्यामुळे त्यांनी पोपट नेमले आहेत. बारामतीचे पोपट बोलू लागले आहेत. आमचे कपडे कोणी उतरवू शकत नाहीत. तुमचे वेगवेगळ्या निवडणुकीत सगळे कपडे उतरविले गेलेले आहेत. कोणाची सुपारी घेण्यापेक्षा घरी शांत बसा.

दरम्यान या टीकेला तुलसी जोशी यांनी काही फोटो फेसबुकवर टाकून सणसणीत प्रतिऊत्तर दिलं आहे आणि तुम्ही एक कराल तर आम्ही दहा करू आणि राज ठाकरेंच्या आदेशाप्रमाणे तुटून पडू असा संदेश दिला आहे. तुलसी जोशी यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर दोन फोटो सहित म्हटलं आहे, “फडणवीस साहेब! आमच्या चड्ड्यांची काळजी सोडा, ‘तुमच्या चड्ड्यांचा खरा वापर मतदाराने सुरु केला आहे. तुमच्या सभा संपल्या की मतदार तिथल्यातिथेच स्वच्छता अभियाना राबवत आहे, नाहीतर चड्डी शिवायला घेत आहे आणि त्यातून तुमची लायकी दाखवत आहे’…उगाच मनसे आणि आमच्या राज साहेबांवर यायचं नाही, नाहीतर ६ एप्रिलला उरल सुरल पण सुटायचं अंगावरचं’ काळजी घ्या!’

काय आहे ती नेमकी पोस्ट?

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या