7 October 2022 6:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 08 ऑक्टोबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Apple iPhone 14 Plus | ॲपल आयफोन 14 प्लसची आज विक्री सुरू, किंमत आणि फीचर्ससह सर्व डिटेल्स चेक करा Numerology Horoscope | 08 ऑक्टोबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Penny Stocks | या 18 रुपयाच्या शेअरने 170 टक्क्यांचा मल्टीबॅगर परतावा दिला, ता 1 शेअरवर 5 फ्री बोनस शेअर्स मिळणार, स्टॉक नेम नोट करा Dry Brushing  | डेड स्किन काढून त्वचा बनवा चमकदार, घरीच करा ड्राय ब्रशिंग, या टिप्स फॉलो करा शिंदेंची सभा फ्लॉप तर शिवाजीपार्कची सभा गाजल्याचे माध्यमांवर दिसल्याने भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांचा जळफळाट?, भावनिक टिपण्या सुरु Mutual Funds | टॉप 10 म्युच्युअल फंड योजना ज्या गुंतवणूकदारांचा पैसा वेगाने वाढवत आहेत, त्या फंडाच्या योजना आणि यादी सेव्ह करा
x

मोदींजी तुमच्या भाषणबाजीने लोकांच पोट भरत नाहीत: सोनिया गांधी

विजापूर : मोदीजी तुमच्या विकासाच्या घोषणांनी कर्नाटकातील जनतेला काहीच फायदा झाला नाही. मोदीजी तुम्ही उत्तम अभिनय करता, परंतु अभिनयाने सामान्य जनतेचं पॉट भरत नाही अशी खरमरीत टीका सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदींवर कर्नाटकातील सभे दरम्यान केली.

सत्तेत आल्यावर म्हणजे ४ वर्षापूर्वी तुम्ही ‘सब का साथ, सब का विकास’ अशी घोषणा दिली होती. त्या घोषणेच काय झाले?, असा खडा सवाल करीतच, त्या विकासाच्या घोषणेचा तुम्ही कर्नाटकातील जनतेला काहीच फायदा होऊ दिला नाहीत. तुमच्या विकासाच्या घोषणा ह्या कर्नाटकातील सामान्य लोकांपर्यंत पोहोचल्याच नाही अशी टीका करत सोनिया गांधींनी पंतप्रधानांवर थेट हल्ला चढवला.

पुढे सोनिया गांधी टीका करताना म्हणाल्या की, नरेंद्र मोदी कर्नाटकात सिद्धरामय्या सरकार भ्रष्ट असल्याचे सांगत आहेत. परंतु केंद्र सरकारमधील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी लोकपालाची नियुक्ती करण्याचे मात्र नरेंद्र मोदी मुद्दामच स्वतःच टाळत आहेत. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लोकपाल कायदा २०१४ मध्ये मंजूर झाला. परंतु केंद्र सरकारने त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी न करणे म्हणजे भ्रष्टाचार लपवण्याचा प्रयत्न करणे आहे, असेही त्या मोदी सरकारवर टीका करताना म्हणाल्या.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1660)#Rahul Gandhi(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x