महत्वाच्या बातम्या
-
केंद्राने OBC एम्पिरिकल डेटा द्यावा | सुप्रिया सुळेंची संसदेत मागणी | भाजप नेत्यानं म्हटलं टाईमपास...
दिल्लीत सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. सध्या संसदेत आरक्षण आणि घटनादुरुस्तीवरून दावे प्रतिदावे सुरु झाले आहेत. त्यालाच अनुसरून राज्यातील मराठा आरक्षण आणि ओबीसी राजकीय आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
युवासेनेच्या ‘त्या’ निष्ठावान जिल्हाध्यक्षाच्या नाराजीवर सरदेसाईंनी दाखवलं नैतृत्व कौशल्य | नेमकं काय घडलं?
जवळपास सर्वच पक्षांमध्ये निष्ठावंत कार्यकर्ते असतात पण प्रत्येकाला न्याय मिळतोच असे नाही. अनेकदा नवख्या आणि पब्लिसिटी तसेच समाज माध्यमांवर स्टन्ट करणारे पदाधिकारी पक्षातील वरिष्ठ नेत्यांमार्फत वशिल्याने पद मिळवून जुन्या पदाधिकाऱ्यांवर अन्याय करतात. पक्ष बांधणी करणारे पदाधिकारी अनेकदा चमकोगिरी पदाधिकाऱ्यांमुळे पक्षश्रेष्ठींच्या समोर येतं नाहीत. मात्र शिवसेनेची युवा शाखा असलेल्या युवासेनेचे राष्ट्रीय सचिव वरुण सरदेसाई मात्र निष्ठावंत कार्यकर्त्याला विसरले नाहीत.
4 वर्षांपूर्वी -
‘त्या’ २७ नगरसेवकांना कोणते गाजर दिले ते लवकरच कळेल - गिरीश महाजन
सरकारच्या तिजोरीत खडखडाट असून गेल्या वर्षभरात कोणत्याही योजनेसाठी पैसे देण्यात आलेले नाही. सरकार स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी शिवसेनेने भाजपाला जोरदार धक्का देताना तब्बल २७ नगरसेवकांचा प्रवेश घडवून आणला होता. त्यावर गिरीश महाजन यांनी भाष्य केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपला मिळणाऱ्या निवडणूक निधीचा आकडा एखाद्या उद्योग समुहासारख्या वार्षिक उलाढालीप्रमाणे - सविस्तर वृत्त
मागील वर्षी भारतीय जनता पक्षाने इलेक्टोरल बाँडच्या (रोखे) माध्यमातून जवळपास ७५ टक्के देणगी मिळवली असून मुख्य विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसला मात्र फक्त नऊ टक्केच देणगी मिळवण्यात यश आलं. भारतीय निवडणूक आयोगाकडून ही माहिती मिळाली आहे. ३ वर्षांपूर्वी इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून राजकीय पक्षांना देणगी मिळवण्याची योजना आणण्यात आली होती. यामध्ये देणगीदाराची ओळख जाहीर होत नसल्याने याचा वापर वाढला आहे.
4 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमुळे भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांना मनसेसोबतच्या युतीवर चर्चाही नको - सविस्तर वृत्त
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर भाजप आणि मनसे यांच्यातील युतीबाबतच्या चर्चांनी जोर धरला. परंतु, दिल्ली दौऱ्यावर असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या बड्या नेत्यांची याबाबत कुठेच वाच्यता झाली नसल्याचं समोर आलं आहे. चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर केंद्रीय भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मौन बाळगणंच पसंत केलं आहे. इतकंच नाही तर सध्या ही भेट टाळता आली असती अशी केंद्रीय भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची धारणा असल्याची माहिती समोर आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
केंद्राने खाऊचा डबा दिला, पण डबा रिकामाच आहे | घटना दुरुस्ती विधेयकावरून राऊतांची टीका
१०२ व्या घटनादुरुस्तीमुळे सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) निर्माण करण्याचे अधिकार पुन्हा राज्यांना बहाल करण्यासंदर्भात संसदेत विधेयक मांडले गेले आहे. मात्र केंद्र सरकारला उघडे पाडण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने कंबर कसली आहे. हे एसईबीसी प्रवर्ग तयार करूनही मराठा आरक्षण देण्यात अडचण येऊ शकते हे लक्षात घेऊन आता घटनेत नमूद असलेल्या आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याचे विधेयक अथवा प्रस्ताव मांडावा यासाठी आघाडी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
सर्वच राज्यांची कोंडी | आरक्षणाची 50% मर्यादा उठवणं गरजेचं | SEBC प्रवर्ग ठरवला तरीही इंद्रा साहनी निकालाची अडचण
१०२ व्या घटनादुरुस्तीमुळे सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) निर्माण करण्याचे अधिकार पुन्हा राज्यांना बहाल करण्यासंदर्भात संसदेत विधेयक मांडले गेले आहे. मात्र केंद्र सरकारला उघडे पाडण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने कंबर कसली आहे. हे एसईबीसी प्रवर्ग तयार करूनही मराठा आरक्षण देण्यात अडचण येऊ शकते हे लक्षात घेऊन आता घटनेत नमूद असलेल्या आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याचे विधेयक अथवा प्रस्ताव मांडावा यासाठी आघाडी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
भाजपकडून OBC आ. संजय कुंटेंना पुढे करून पंकजा मुंडेंच्या राजकारणाला धक्का देण्याची खेळी? - सविस्तर वृत्त
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील बडे नेते दिल्लीत असून महाराष्ट्रातील नवीन प्रदेशाध्यक्ष निवडीवर सध्या खलबते सुरू आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक असलेले जळगाव-जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. संजय कुटे हे फ्रंटलाइन नेते नसले तरी ते मागील चार टर्म आमदार म्हणून निवडून येत आहेत. ते मूळचे बुलडाण्यातील आहेत. काही वर्षांपासून ते देवेंद्र फडणवीस यांचे खासमखास आहेत.
4 वर्षांपूर्वी -
टोक्यो ऑलिम्पिक पदकवीरांचा सत्कार | भव्य कामगिरी करणारे खेळाडू बॅनरवर 'मायक्रो' झाले तर मोदी भव्य
टोकियो ऑलिम्पिकमधील चमकते तारे नीरज चोप्रा, रवी दहिया, बजरंग पुनिया, लवलिना बोर्गोहेन आणि टोकियो ऑलिम्पिकमधील पुरुष हॉकीपटू देशात परतले आहेत. विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. ऑलिम्पिक चॅम्पियन्सचे बँड-बाज्यासह स्वागत करण्यात आले. हे सर्व खेळाडू विमानतळावरून थेट अशोका हॉटेलमध्ये जात आहेत. सर्व खेळाडूंचा ताफा हॉटेलकडे रवाना झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
बिल्डरांनी रखडवलेले SRA प्रकल्प ताब्यात घेणार - जितेंद्र आव्हाड
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एसआरएचे प्रकल्प रखडवणाऱ्या बिल्डरांना मोठा दणका दिला आहे. आशय पत्र आणि बँकांकडून कर्ज घेऊनही बिल्डरांनी एसआरएचे प्रकल्प पूर्ण केले नाहीत. हे प्रकल्प एसआरए ताब्यात घेणार असून एसआरए स्वत: लोकांना घरं बांधून देणार आहे, अशी घोषणा जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. त्यामुळे एसआरएतील घरांची वाट पाहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
पंकजा माझी बहीण, अन्याय झाल्यास मला सांगावं मग बघू | जाणकरांचा पंकजा मुंडे विरोधकांना इशारा
राष्ट्रीय समाज पार्टी हा फुले, शाहू आणि आंबेडकरांना मानणारा पक्ष आहे. आमची लढाई ही हिंदुत्ववाद्यांसोबत आहे, असं सांगतानाच रासपचे 50 आमदार निवडून आल्यास मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करू, अशी घोषणा रासपचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी केली.
4 वर्षांपूर्वी -
आमची लढाई ही हिंदुत्ववाद्यांसोबत | राज्यात 200 विधानसभांमध्ये रॅली काढणार - महादेव जाणकर
राष्ट्रीय समाज पार्टी हा फुले, शाहू आणि आंबेडकरांना मानणारा पक्ष आहे. आमची लढाई ही हिंदुत्ववाद्यांसोबत आहे, असं सांगतानाच रासपचे 50 आमदार निवडून आल्यास मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करू, अशी घोषणा रासपचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी केली.
4 वर्षांपूर्वी -
दादर-नायगाव पोलिस वसाहतीतील कुटुंबीय राज ठाकरेंच्या भेटीला
दादरच्या नायगाव परिसरातील पोलीस वसाहतीतील नागरिकांना घर खाली करण्याची नोटीस अली आहे. पोलिस वसाहत धोकादायक असल्याने या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. यानंतर पोलिसांच्या कुटुंबीयांकडून आक्रोश व्यक्त केला जात असून विरोधी पक्षनेत्यांनीही त्यांच्या भेटी घेतल्या आहेत. दरम्यान पोलिसांचे कुटुंबीय आज याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर दाखल झाले होते. राज ठाकरेंनी यावेळी त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यावर केंद्राचा विचार सुरू | लोकसभेत माहिती, समितीचीही स्थापना
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सोमवारी लोकसभेत दिली. एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरात मेघवाल यांनी संसदेत ही माहिती दिली.
4 वर्षांपूर्वी -
ते जाहीर झालेलं बक्षीस द्या, तर ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रित करू | नीरजच्या त्या ट्विटने भाजपाची पोलखोल
राहुल गांधींनी नीरज चोप्राचे जुने ट्विट्स शेअर केले आहेत. त्यात नीरज म्हणतो की, ”तुम्ही जी रक्कम देण्याची विनंती केली होती, ती आम्हाला द्यावी. म्हणजे आम्ही आमचे पूर्ण लक्ष्य येणाऱ्या ऑलिम्पिक खेळावर करू शकू.” तर, दुसऱ्या एका ट्विटमध्ये नीरज म्हणतो की, ”सर जेव्हा आम्ही पदक जिंकून येतो, तेव्हा तुम्ही आणि संपूर्ण देश आमच्यावर गर्व करता. हरियाणातील खेळाडूने जगभर नाव काढलं, असं म्हणता. दुसरे राज्यही हरियाणाच्या खेळाडूंचे उदाहरण देतात.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेना खासदाराची पदाधिकारी मेळाव्यात थेट राष्ट्रवादीला बुडवण्याची भाषा | वाद अजुन पेटणार?
महाविकास आघाडीत सगळं काही आलबेल असल्याचं आमदार-मंत्री, पक्षातील नेते मंडळी दाखवतात. मात्र प्रत्यक्षात यापेक्षा चित्र वेगळं आहे. कारण परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या एका स्फोटक व्हिडीओ क्लिपने राष्ट्रवादी-शिवसेनेतला संघर्ष अधोरेकित झालाय. एका मेळाव्यात खासदार संजय जाधव बोलत असताना ते राष्ट्रवादीवर असे काही घसरले की त्यांनी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा बाप काढला. एवढ्यावरच ते शांत बसले नाहीत तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला बुडविण्याची भाषा केली.
4 वर्षांपूर्वी -
लोकल रेल्वे प्रवास | राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना विनंती पत्रं दिलं होतं | आज मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार
मुख्यमंत्र्यांनी रविवारी रात्री आठ वाजता सोशल मीडियावर जनतेशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले, आज (दि ९) कोरोना राज्य कृती दलाची बैठक बोलावली आहे. तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर ज्या जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आहे तेथील निर्बंध उठवण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. प्रार्थनास्थळे, हाॅटेल आणि माॅल्स उघडण्यास काही अटींवर परवानगी देण्यात येईल. तसेच सामन्यांना मुंबई लोकलने प्रवास करण्यासाठी काही अटींवर मान्यता दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
आगामी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का देण्यासाठी अमित शहांची दिल्लीत बैठक?
विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे दोघेही दिल्लीत दाखल झाले आहेत. यासोबतच भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे जयकुमार रावळ निरंजन डावखरे हे देखील दिल्लीत आज उपस्थित आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षात नेमकी काय खलबतं सुरू आहेत याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
सदिच्छा भेटीआडून भाजप मनसे पदाधिकाऱ्यांना गळाला लावणार? | भाजप आमदार मनसे शाखेत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत भारतीय जनता पक्ष करणार नसल्याचे जवळपास निश्चित झालं आहे. काही दिवस अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भेटीमुळे चर्चांना चांगलाच उधाण आलं होतं. जिथे भाजप मनसे युतीची चर्चा आहे तिथे या दोघांच्याही भेटीगाठी वाढल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
राम शिंदे समर्थक ढोकरीकर आ. रोहित पवारांच्या गटात | नगरपरिषदेच्या निवडणुकांपूर्वी धक्का
भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. भाजपचे संघटन सरचिटणीस प्रसाद बापूसाहेब ढोकरीकर यांनी पदत्याग केला आहे. ढोकरीकर सध्या राष्ट्रवादीच्या संपर्कात असून आमदार रोहित पवार यांच्या कार्यक्रमांनाही ते उपस्थित राहताना दिसतात. राम शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER