नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या काळात भारतातील नेत्यांकडे शहाणपण नसल्यामुळे पंजाबमधील तीर्थस्थळ कर्तारपूर हे पाकिस्तानात गेले, असे सांगत पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेलांच्या कर्तुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. तसेच नरेंद्र मोदी स्वतःला सर्वेश्रेष्ठ नेता सिद्ध करण्यासाठी गांधी, पटेल आणि इतर नेत्यांना खालच्या पातळीवर घेऊन जाऊ शकतात, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्षांनी मोदींवर निशाणा साधला.
राजस्थानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका प्रचार सभेत काँग्रेसवर टीका करताना मोदी म्हणाले होते की, स्वातंत्र्याच्यावेळी कर्तारपूर हे पाकिस्तानमध्ये गेले. कारण त्यावेळच्या काँग्रेस नेत्याकडे दूरदृष्टी आणि शीख समाजाच्या भावनांची कदर नव्हती. दरम्यान त्या टीकेला राहुल गांधी अचूक पकडत मोदींना लक्ष केलं आहे.
