मुंबई : छगन भुजबळ जामिनावर बाहेर आल्यानंतर ते पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांची भेट घेण्यासाठी ‘सिल्व्हर ओक’ला रवाना झाले आहेत.
सांताक्रूझमधील आपल्या निवासस्थानावरुन पवारांच्या भेटीसाठी भुजबळ रवाना झाले असल्याचे वृत्त आहे.
सध्या राष्ट्रवादीचं सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलन सुरु आहे. हल्लाबोल आंदोलनाची सांगता पुण्यात होणार आहे, त्यामुळे भुजबळ पुण्यात होणाऱ्या पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का हे निश्चित होऊ शकत.
