30 April 2025 2:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स सेक्टर कंपनी शेअर्स खरेदी करून ठेवा, मोठा अपसाईड परतावा मिळेल - NSE: BEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सवर टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, 78 रुपये टार्गेट प्राईस जाहीर - NSE: SUZLON Mazagon Dock Share Price | मल्टिबॅगर शेअर रेकॉर्ड हाय लेव्हलवर, आता मोठ्या तेजीचे संकेत, टार्गेट अपडेट - NSE: MAZDOCK
x

२१ हजार कोटींचे ड्रग्ज पकडतात, ते पैसे कुठे जातात, कुठे वापरता हे सर्व आम्हाला माहित | योग्यवेळी खुलासा करु - संजय राऊत

MP Sanjay Raut

मुंबई, २३ सप्टेंबर | गुजरातमध्ये पकडलेल्या २१ हजार कोटींच्या ड्रग्जवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. हे पैसे कुठून येतात, कुठे जातात आणि कुठे वापरले जातात, याचा योग्यवेळी आम्ही खुलासा करु, असे राऊत यांनी म्हटले आहे. मुंबईमध्ये आज (गुरुवार) पत्रकारांशी बोलत असताना खासदार संजय राऊत यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात गुजरातमध्ये मुंद्रा पोर्टवर पकडण्यात आलेल्या २१ हजार कोटींच्या ड्रग्जचा उल्लेख केला. ‘२१ हजारांचे ड्रग्ज कुठे पकडतात, ‘ते पैसे कुठे जातात आणि कुठे वापरले जातात, हे सर्व आम्हाला माहित आहे. त्याचा योग्यवेळी खुलासा करु,’ असेही खासदार संजय राऊत म्हणाले.

२१ हजारांचे ड्रग्ज पकडतात, ते पैसे कुठे जातात, कुठे वापरता हे सर्व आम्हाला माहित, योग्यवेळी खुलासा करु – We will reveal soon where from drugs money comes and where it get utilize said Shivsena MP Sanjay Raut :

भाजप हा पैसेवाल्यांचा पक्ष आहे, असे सांगत राऊत म्हणाले, रुपया, सव्वा रुपया, सव्वा कोटी, सव्वाशे कोटी हे आकडे फक्त दाखवायला असतात. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचा, प्रत्येक शिवसैनिकाचा एक सन्मान आहे. तुम्ही अशा प्रकारे त्यांच्यावर टीका करु शकत नाही. आम्हाला माहिती आहे तुमच्याकडे भरपूर पैसा आहेत. पैसे कुठून आले हे आम्हाला माहित आहे. २१ हजार कोटींच्या ड्रग्जचा उल्लेख केला. ते म्हणाले, २१ हजारांचे ड्रग्ज कुठे पकडतात, ‘ते पैसे कुठे जातात आणि कुठे वापरले जातात, हे सर्व आम्हाला माहित आहे. त्याचा योग्यवेळी खुलासा करु,’ असेही संजय राऊत म्हणाले.

काय आहे गुजरात ड्रग्ज प्रकरण?
गुजरातच्या कच्छच्या मुंद्रा बंदरावर हेरॉईन पकडण्यात आले होते. ज्याची किंमत सुमारे 21 हजार कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. ही हेरॉईन अफगाणिस्तानातून आयात केले जात होते. दरम्यान, त्याला गुप्तचर यंत्रणेने बंदरावर पकडले आहे. हे हेरॉईन टेलकम पावडरच्या स्वरूपात भारतात आणले जात होते. परंतु, एजन्सीने वेळीच लक्ष दिल्याने बंदरावर ही आयात रोखण्यात आली. दरम्यान, एजन्सीची ही आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. यातील कंटेनर आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील आशी ट्रेडिंग फर्मच्या माध्यमातून आफगाणिस्तानातून मुंद्रा बंदरावर आयात करण्यात आले होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: We will reveal soon where from drugs money comes and where it get utilize said Shivsena MP Sanjay Raut.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या