29 March 2024 7:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

पुण्यात चंपा साडी सेंटरचं राष्ट्रवादीकडून उदघाटन

NCP, Chandrakant patil, Champa Sadi Centre

पुणे: ”आम्हाला हवी विकासाची गाडी, नकाे आम्हाला चंपा साडी” असे म्हणत एनसीपीच्यावतीने चंद्रकांत पाटील यांनी साड्या वाटल्याचा निषेध करण्यात आला. पुण्यातील खंडाेजीबाबा चाैक येथे एनसीपीकडून आंदाेलन करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील आणि भारतीय जनता पक्षाच्या निषेधार्थ घाेषणा देण्यात आल्या.

चंद्रकांत पाटील यांनी काेथरुड विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकांच्या माध्यमातून काेथरुड भागात घरकाम करणाऱ्या महिलांना दिवाळीच्या निमित्ताने साड्यांचे वाटप केले. या साडी वाटपाबाबत अनेकांनी आक्षेप घेतले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देखील याचा निषेध करण्यात आला हाेता. आज एनसीपीच्या कार्यकर्त्यांकडून पुण्यातील खंडाेजीबाब चाैकात निषेध आंदाेलन करण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित आमदार आणि एनसीपीचे शहराध्यक्ष चेतन तुपे, एनसीपीचे प्रवक्ते अंकुश काकडे आदी उपस्थित हाेते. कंपनीकडून रिजेक्टेड साड्या वाटल्याचा आराेपही यावेळी करण्यात आला.

यंदाची दिवाळी कष्टकरी, गरजूंबरोबर साजरी करावी, कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यानुसार राज्यातील अनेक भागांत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून कोथरूडमधील कष्टकरी महिलांचा सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येकाला साडी देण्याचे आवाहन केले. साधारणपणे दहा हजार साडय़ा जमा होणार असून त्याचे वाटप करण्यात येणार आहे. असे चंद्रकांत पाटील यावर म्हणाले.

यावर कोथरूड विधानसभा मतदारसंघामधून लढणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किशोर शिंदे म्हणाले की, सांगली, कोल्हापूर, पुणे या शहरांत अतिवृष्टी झाली. पुराचा फटका अनेकांना बसला. या भागातील महिलांना साडी तसेच अन्य वस्तूंचे वाटप करण्याची आवश्यकता होती. साडीवाटप योजना म्हणजे आमिष दाखविण्याचा प्रकार आहे. विकासाचे राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला साडीवाटपाची गरज का पडली?

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x