28 May 2024 10:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 29 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | PSU स्टॉकबाबत फायद्याची अपडेट, पुन्हा मल्टिबॅगर परतावा देणार? यापूर्वी दिला 1150% परतावा IPO GMP | पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, स्वस्त IPO शेअरचा ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, संधी सोडू नका Patel Engineering Share Price | स्टॉक चार्टने दिले संकेत, 59 रुपयाचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला Ashok Leyland Share Price | शेअर स्पीड पकडणार! वेगाने परतावा देणार, तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस किती? Gold Rate Today | बोंबला! आज सोन्याचा भाव गगनाला भिडला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या HAL Vs BEL Share Price | टॉप 6 शेअर्स स्विंग हाय ब्रेकआउटवर, मजबूत परतावा देणार, संधी सोडू नका
x

देश गोडसेवादी की गांधीवादी! शरद पोंक्षेंच्या विरोधात घोषणाबाजी; विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Veer Savarkar, Ferguson College amphitheater, Sharad Ponkshe

पुणे: ‘मी सावरकर’ या कार्यक्रमासाठी आज पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ॲम्फी थिएटरमध्ये मोठी गर्दी उसळली. अभिनेते शरद पोंक्षे हे या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आहेत. दरम्यान, काही विद्यार्थ्यांनी पोंक्षे यांचा निषेध केला. ‘देश गोडसेवादी की गांधीवादी’, ‘गांधीजींचा खून करणाऱ्या गोडसेचे समर्थन करणाऱ्या शरद पोंक्षेंचा जाहीर निषेध’, असे फलक घेऊन विद्यार्थी आपला निषेध नोंदवत होते. स्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले आहे.

कार्यक्रमाचे आयोजक रणजित नातू म्हणाले की, “मी सावरकर या कार्यक्रमाचे यंदाचे तिसरे वर्ष असून या ठिकाणी यापुर्वी अनेक वक्ते आले आहेत. यंदाच्या वर्षी शरद पोंक्षे यांना निमंत्रित करण्यात आले असून ते त्यांचे विचार या ठिकाणी मांडणार आहेl. मात्र या कार्यक्रमापुर्वी काही संघटनांकडून सावरकर यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हे आम्ही खपवून घेतले जाणार नसल्याचे त्यांना सांगितलं होते”.

सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी सरकार वाट का पाहत आहे, असा थेट सवाल यावेळी पोंक्षे यांनी केला. सावरकरांना भारतरत्न दिल्यास तो भारतरत्नाचाच सन्मान ठरेल, असे नमूद करताना सावरकरांना भारतरत्न म्हणायला सुरुवात करा, असे आवाहन पोंक्षे यांनी केले.

 

News English Summery: A large crowd flocked to the amphitheater of Ferguson College in Pune for the program ‘Mi Savarkar’. Actor Sharad Ponkshe is the main speaker of the program. Meanwhile, some students protested against Ponkshe. The students were registering their protest with the slogan ‘Desh Godsevadi or Gandhian’, ‘Sharad Ponkshe who supports Godse assassinated Gandhiji’. The police have taken all of them into custody so as not to disturb the situation.

 

Web News Title: Story huge crowd in Ferguson College amphitheater for me Veer Savarkar Program.

हॅशटॅग्स

#Pune(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x