19 July 2019 9:41 AM
अँप डाउनलोड

पुण्यातील दुर्घटनेची सखोल चौकशी करा: मुख्यमंत्र्यांचे आदेश

पुण्यातील दुर्घटनेची सखोल चौकशी करा: मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई : पुण्यातील कोंढवा परिसरात सुरक्षा भिंत कोसळून दुर्दैवी अपघात घडला आहे. सदर घटनेत तब्बल १५ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या संतापजनक घटनेला नक्की जबाबदार कोण यावरुन मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. प्रसार माध्यमांनी देखील या विषयाला अनुसरून सरकारला धारेवर धरले आहे. पुण्यातील या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवेदना व्यक्त केली असून या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत.

कोंढव्यातील सोमजी पेट्रोल पंपाजवळील आल्कर स्टायलस या इमारतीची संरक्षक भिंत मध्यरात्री १:३० वाजण्याच्या सुमारास बाजूलाच लागून असलेल्या लेबर कॅम्पवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकूण १५ जणांचा नाहक मृत्यू झाला़ आहे आणि अग्निशामक दलाला ठिगाऱ्यांखालून एकूण ३ जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले आहे. एकूण मृतांमध्ये ११ पुरुष, ३ महिला आणि ४ मुलांचा समावेश असल्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अनुरूप वधू - वर सुचक मंडळ

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(239)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या