Job Opportunity | अनेक तरुणांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा असते. सध्या केंद्र सरकारच्या एका कंपनीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. केंद्र सरकार अंतर्गत असणाऱ्या कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया सुरू असते. तुम्ही सुद्धा एखाद्या सरकारी नोकरीच्या शोधात असाल तरीही बातमी तुमच्यासाठी.
सरकारी नोकरी मिळवणं अनेक तरुणांचे स्वप्न असून प्रत्येकालाच हे स्वप्न साकार करता येत नाही. परंतु केंद्र सरकारमुळे अगदी 10 वी उत्तीर्ण असलेल्या तरुणाचं स्वप्न देखील पूर्ण होऊ शकणार आहे. केंद्रांतर्गत असणाऱ्या बऱ्याच कंपन्यांमध्ये वेळोवेळी नोकरीसाठी भरती निघत असते. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी केंद्र सरकारने दिलासादायक बातमी सांगितली आहे.
कोणत्या कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी :
सध्या केंद्र सरकारच्या ‘यंत्र इंडिया लिमिटेड कंपनीमध्ये’ 3883 जागांची रिक्त भरती निघाली आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज प्रक्रियेला सुरुवात करावी. या नोकरीबाबत जाहिरात देखील प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे नोकरीची संपूर्ण माहिती वाचण्यासाठी जाहिरात पहावी.
नोकरीसाठी पात्रता :
केंद्र सरकारच्या यंत्र इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये भरती निघाली असून. नोकरीसाठी तरुणांची पात्रता केवळ 10 वी पास दिली गेलेली आहे. म्हणजेच 10 वी पास असलेला कोणताही तरुण या भरतीसाठी पात्र आहे. एवढंच नाही विचार तरुणांनी आयटी क्षेत्रात उत्तीर्णता मिळवली आहे ते सुद्धा या नोकरी करिता अर्ज करण्यास पात्र आहेत.
त्याचबरोबर या अर्जासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आवेदन करू शकतात्याचबरोबर नॉन आयआयटी पदाकरिता उमेदवाराकडे 50 टक्क्यांसह उत्तीर्ण असलेली पत्रिका असावी. दरम्यान NCVT किंवा SCVT मधून प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
या सरकारी नोकरीची अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2024 दिली गेली आहे. नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी आतापासूनच अर्ज करण्यास सुरुवात केली पाहिजे.
Latest Marathi News | Job Opportunity 06 November 2024 Marathi News.
