1 May 2025 7:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

दिव्यांगांना, अपंगांना 2000 रुपये सरकारी मदत, अर्ज सुरू | असा भरा ऑनलाईन फॉर्म

Disability Scheme Pune 2021

पुणे, ०२ जुलै | समाज विकास विभाग, पुणे महानगरपालिका जाहिर प्रकटन सन 2021-2022 कोविड-१९ प्रादुर्भावाच्या काळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ४०% पेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या नागरिकांच्या बँक खात्यामध्ये आर.टी.जी.एस. द्वारे प्रत्येकी रक्कम रू.2000 प्रमाणे एकदाच अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

सदर अर्थसहाय्य देण्याकरीता पुणे शहर हद्दीतील ४०% पेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या नागरिकांकडून अर्ज मागविणेत येत आहे. अर्थसहाय्य घेणेकरीता dbt.punecorporation.org या संकेतस्थळावरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येईल किंवा खालील नमुना प्रमाणे माहिती भरून पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयाच्या ठिकाणी सादर करता येईल.

ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक: Click करा किंवा Copy करा http://dbt.punecorporation.org/app/index.html#!/

ऑफलाईन अर्ज डाऊनलोड करा: क्लिक करून डाउनलोड करा अथवा पुढील लिंक कॉपी करून ब्राऊझरवर एंटर करून डाउनलोड करा : https://www.maharashtranama.com/wp-content/uploads/Handicap-Yojana.pdf

अर्जा सोबत दिव्यांग प्रमाणपत्र, बँकेत खाते असल्याबाबत तसेच आर.टी.जी.एस. द्वारे रक्कम जमा करण्यासाठी बँकेच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत, पुणे शहर हद्दीत वास्तव्याचा पुरावा, आधार कार्ड, रेशनिंग कार्डची झेरॉक्स प्रत इ. कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क क्र. ०२०-२५५०१२८३०२०-२५५०१२८४ या दूरध्वनीवर संपर्क साधावा.

* सदर अर्ज स्विकारण्याची मुदत: दि.०१ जून २०२१
* अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत: दि.३० जुलै २०२१ पर्यंत राहील (कार्यालयीन वेळेत व कार्यालयीन दिवशी).

आवश्यक कागदपत्रे:
* दिव्यांग प्रमाणपत्र
* बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत
* पुणे शहर हद्दीत वास्तव्याचा पुरावा
* आधारकार्ड
* रेशनिंग कार्डची झेरॉक्स प्रत

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Disability Scheme Pune 2021 Corporation Online form application news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या