मुंबई ७ ऑगस्ट |  आपल्या आजूबाजूला अनेकांना जेवणाव्यतिरिक्त चटपटा खायला खूप आवडते. शाळा, महाविद्यालय आणि ऑफिसमधून घरी जाताना काही तरी खाण्याची इच्छा होते. त्यावेळी ज्याला जे आवडेल त्यांनी ते ते डिश खाण्यास पसंती देतात. त्यातील एक डिश म्हणजे चिकन पहाडी कबाब तुम्हाला जर बाहेरच्यासारखी घरच्या घरी चिकन पहाडी कबाब बनवायची असेल तर एक ट्रिक जाणून घ्याच.

साहित्य:
* 500 ग्राम चिकन
* 4-5 पालक
* 1/2 वाटी कोथिंबीर
* 1/2 वाटी पुदिना
* 4-5 लसूण
* 1 चमचा अर्ध आलं
* 1 कप दही
* 2 चमचे मिल्क पावडर
* 1 टीस्पून गरम मसाला
* 1 टीस्पून धने पावडर
* चवीनुसार मीठ
* 1 स्मोकी फ्लेवर साठी नारळाची करवंटी

कृती:
१.
500 gms बोनलेस चिकन घ्यावे. त्याचे बाईट साइज पिसेस कापावे.
२. ४-५ पालक,अर्धी वाटी कोथिंबीर आणी पुदिना,४-५ लसूण,छोटा तुकडा आलं ह्याची मिक्सर मध्ये स्मूथ पेस्ट करून घ्यावी. बोनलेस चिकन मध्ये वाटलेले हिरवे वाटण,धने पावडर,गरम मसाला,दही,२ चमचे मिल्क पावडर आणी मीठ टाकून २-३ तास मॅरीनेट करावे.
३. चिकन चे पिस शॅलो फ्राय करावे. (डीप फ्राय करू नये)
४. कबाब साठी स्मोकी फ्लेवर : नारळाची करवंटी घ्यावी. ती कमी गॅस वर नीट भाजून घ्यावी. तळलेल्या चिकन पिसेस मध्ये वाटीत भाजलेली करवंटी ठेवावी आणि झाकण लावावे. ४-५ मिनिटा मध्ये करवंटी मधून येणाऱ्या धुरा मुळे चिकन पिसेस ला छान हॉटेल सारखा स्मोकी फ्लेवर येतो.चिकन पहाडी कबाब तयार!

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Chicken Pahadi Kebab recipe in Marathi news updates.

Special Recipe | घरच्याघरी खमंग चिकन पहाडी कबाब बनवा