मुंबई, ११ ऑगस्ट | घरच्याघरी बनवण्यासाठी अनेक स्वादिष्ठ रेसिपी आहेत. त्यात काही पदार्थ आपण केवळ हॉटेलमध्येच अनिभवतो. पण जर त्यातील अनेक पदार्थ घरी बनवणं देखील शक्य असतं आणि ते देखील हॉटेलपेक्षाही अधिक चवदार. चला तर आज पाहूया पिझ्झा उत्तपा बनवण्यासाठी खास रेसिपी…
साहित्य:
* अर्धी वाटी उडीद डाळ
* दीड वाटी तांदूळ
* मीठ
* अर्धी वाटी लांबट चिरलेला कांदा
* अर्धी वाटी भोपळी मिरची
* ७/८मशरूम्स
* एक मोठा टोमॅटो
* एक वाटी किसलेलं चीझ
* हिरवी मिरचीचे लांबट उभे काप
संपूर्ण कृती:
१. डाळ-तांदूळ भिजत घालून बारीक वाटून घ्यावे आणि रात्रभर भिजत ठेवावे.
२. तवा तापवून त्यावर ते सोडावे आणि वाटीभर पीठ ओतून जाड पसरावे.
३. त्यावर कांदा ,भोपळी मिरची , मशरूमचे काप आणि टोमॅटोचे काप पसरवावे.
४. हिरव्या मिरचीला लिंबाचा रस आणि मीठ लावून वरती पेरावी आणि त्यावर भरपूर चीझ पसरवावे.
५.हे सर्व झाल्यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर उत्तपा होऊ द्यावा.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
Recipe Title: Pizza Uttapam recipe in Marathi news updates.
