12 December 2024 1:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

कोरोना आपत्ती: दिल्लीच्या मरकजवरुन देशात धार्मिक राजकारणाचा प्रयत्न - शरद पवार

Corona Crisis, Covid19

मुंबई, ६ एप्रिल: शरद पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या सूचनांचं योग्य पालन करा असं आवाहन केलं. शरद पवारांनी यावेळी बोलताना सांगितलं की, “सध्याच्या घडीला देशात ४०६७ करोनाच्या केसेस आहेत. तसंच ११८ मृत्यू झाले आहेत. ३२८ रुग्ण बरे होऊन घऱी गेले आहेत. हे प्रमाण दुर्लक्ष करण्यासारखं नाही. करोनाचा रुग्ण बरा होऊ शकतो ही स्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे सूचनांचं पालन केलं पाहिजे. ही आजची गरज आहे”.

तसेच व्हाट्सअँपवरून व्हायरल होणारे पाचपैकी चार मेसेज हे खोटे आहेत. हे मेसेज संभ्रम निर्माण करणारे आणि दिशाभूल करणारे आहेत. असे मेसेज पाठवण्यामागे कुणाचे षडयंत्र आहे का? अशी शंका येते, असं सांगतानाच दिल्लीतील मरकजच्या बातम्या वारंवार टिव्हीवर दाखवण्याची गरज आहे का? असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

महाराष्ट्रातही सोलापूर जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात बैल आणि घोड्यांच्या शर्यती आयोजित करण्यात आल्या होत्या. या शर्यती पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दीही केली होती. मात्र, स्थानिक पोलिसांनी त्यावेळी तत्परता दाखवून या शर्यती रोखल्या. एवढेच नव्हे तर शर्यतीच्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्यांवर गुन्हेही दाखल केले, याकडे पवारांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर देशासमोर अर्थव्यवस्थेवरील विपरीत परिणाम आणि बेरोजगारीचे संकट उभे राहणार असल्याचा इशाराही यावेळी शरद पवार यांनी दिला. त्यासाठी आत्तापासूनच विचार करायला पाहिजे. यादृष्टीने महाराष्ट्रात आर्थिक जाणकारांची एक टास्क फोर्स स्थापन करावी, अशी विनंती आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्याचे पवारांनी सांगितले. राज्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ही टास्क फोर्स पुढील सहा महिने ते वर्षभराच्या काळातील रणनीती निश्चित करेल, असेही शरद पवार यांनी सांगितले.

 

News English Summary: Sharad Pawar, NCP’s surveyor, alleged that an attempt was being made to conduct religious politics across the country at an event held in Merkaj in the Nizamuddin area of Delhi. He interacted with people through Facebook Live on Monday. During this time, he expressed his concern over the environment created by Nizamuddin Merkaj across the country.

 

News English Title: Story communal politics going on over Delhi Nimauzddin Markez Corona virus says NCP Presindet Sharad Pawar News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x