15 May 2024 11:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मालामाल होण्याची संधी! NBCC शेअरसहित हे 4 शेअर्स 50% पर्यंत परतावा देतील, स्टॉक सेव्ह करा Penny Stocks | एक वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, सेव्ह करा टॉप 10 पेनी स्टॉकची यादी Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा शेअर देईल 100% परतावा, एक बातमी येताच स्टॉक खरेदीला तुफान गर्दी Reliance Power Share Price | 26 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी अल्पावधीत दिला 2168% परतावा Old Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीचा लाभ घेण्यासाठी या तारखेपर्यंत भरा ITR, किती फायदा होईल पहा Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी
x

देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा ४००० पार, तर राज्यात देखील परिस्थिती गंभीर

Covid19, Corona Crisis, Corona Virus

नवी दिल्ली, ६ एप्रिल: भारतात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा संख्या वाढत चालली आहे. सोमवारी आरोग्य मंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोनाच्या रुग्णांचा संख्या ४ हजारहून अधिक झाली आहे. भारतात कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत १०९ लोकांचा मृत्यू झाला असून ४०६७ लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर २३२ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. मागील २४ तासांत ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६९३ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत.

दुसरीकडे मुंबईत कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या रविवारी झपाट्यानं वाढली. मुंबईत रविवारी एकाच दिवशी ८१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे रविवारी दिवसाअखेर मुंबईत कोरोना बाधितांचा आकडा हा ४५८ वर पोहोचला. राज्यात मुंबईत कोराना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. यात मुंबईतील प्रभादेवी, वरळी, मलबार हिल, अंधेरी, भायखळा आणि मालाडमध्ये सर्वाधिक पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहे. एकूण रुग्णांपैकी ५३ टक्के रुग्ण हे या भागात आहेत.

मात्र एक धक्कादायक प्रकार देखील समोर आला आहे. साताऱ्यात कॅलिफोर्नियाहून आलेल्या एका वृद्धाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. साताऱ्यातील हा करोनाचा पहिलाच बळी आहे. धक्कादायक बाब म्हणजे प्राथमिक चाचणीत या व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. मात्र, १४ दिवसाच्या उपचारानंतर करण्यात आलेल्या चाचणीत या व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. तरीही त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे साताऱ्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

 

News English Summary: The number of coronas in India is increasing day by day. According to the Ministry of Health on Monday, the number of coronary patients in the country has increased to more than 3,000. So far 109 people have been killed due to corona virus in India and 4067 have been infected with corona. 232 patients have recovered from the disease. In the last 24 hours, 32 people have died. So far 693 new coronary patients have been found.

 

News English Title: Story Corona virus total case India Covid19 total death in country Corona crisis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x