मुंबई, ०४ ऑगस्ट | ऐकताना हा पदार्थ थोडा वेगळा वाटला तरी खाण्यात याची मज्जा काही वेगळीच आहे. घरी आपण काही विशेष असलं तर वडे आणि पुऱ्या नक्कीच बनवतो. पण त्यातही रुचकर पोह्याचे वडे म्हणजे बातच निराळी असते. चला तर आज पाहूया रुचकर पोह्याचे वडे बनविण्यासाठी खास रेसिपी;

साहित्य:
* २ वाट्या जाड पोहे
* १ माध्यम आकाराचा बटाटा
* १ कांदा
* बेसन
* लसूण
* हिरवी मिरची
* कोथिंबीर
* मीठ
* साखर
* आलं आणि तेल

कृती:
१. पोहे थोडे स्वछ धुवून थोडं पाणी ठेवून भिजू द्यावेत
२. ह्या पोह्यात बटाटा कच्च किसून टाकावा.
३. कांदा बारीक चिरून घालावा.
४. आलं किसून घालावं.
५. मिरचीचं वाटण आवडीप्रमाणे घालून चवीप्रमाणे मीठ, साखर घालावी
६. सर्व मिश्रण नीट मळावं आणि नंतर थोडं डाळीच पीठ घालून पुन्हा मळावं
७. या मिश्रणाचे हातावर थापून वडे करून तेलात तळावे

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Recipe Title: Poha Vada recipe in Marathi news updates.

Special Recipe | रुचकर पोह्याचे वडे बनविण्यासाठी खास रेसिपी – नक्की ट्राय करा