Techno Alert | '१२३४५' सर्वाधिक हॅक होणारा पासवर्ड

मुंबई, ०१ मार्च: आपली समाज माध्यमांवरील अकाऊंट सुरक्षित राहावी यासाठी आपण पासवर्ड वापरून ती सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतो. मात्र अनेकदा हे पासवर्ड हॅक होतात आणि तुमची गोपनीय माहिती चोरीला जाते. त्यामुळे पासवर्डमध्ये काही अक्षरं किंवा अंक वापरणं टाळावं असं सतत सांगितलं जातं. मात्र तरीही काहीजण त्याच चुका वारंवार करतात. (Never use 123456 as password for security to protect for hackers)
ब्रिटनमधल्या ‘नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटर’च्या अहवालानुसार जगात कोट्यवधी लोकांचा पासवर्ड हा “१२३४५” आणि “qwerty” असा आहे. विशेष म्हणजे हा पासवर्ड इतका सोपा आहे की कोणीही तो सहज ओळखून एखाद्याच्या सोशल मीडिया अकाऊंटचा गैरफायदा घेऊ शकतो असं त्यांनी आपल्या अहवालात म्हटलं आहे. (According to the UK’s National Cyber Security Center, the passwords of billions of people around the world are “12345” and “qwerty”)
जगातील अडीच कोटींहून अधिक लोक वरील पासवर्ड वापरत आहेत. हा पासवर्ड हॅक होण्याचा आणि गोपनीय माहिती चोरीला जाण्याचा धोका अधिक आहे मात्र तरीही लोक हाच पासवर्ड वापरणं पसंत करतात असं निरिक्षण ‘नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटर’ने नोंदवलं आहे. (More than two and a half crore people around the world are using the above password)
बहुतेकवेळा अनेक युजर्स आपलं नाव पासवर्ड म्हणून ठेवतात. हा पासवर्ड सहज ओळखला जाऊ शकतो त्यामुळे पासवर्ड ठेवताना अक्षर, अंक आणि स्पेशल कॅरेक्टरचा त्यात समावेश असावा असा सल्ला ‘नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटर’नं युजर्सनां दिला आहे. या पासवर्ड व्यतिरिक्त प्रसिद्ध फुटबॉल क्लबची नावं हा देखील अनेकांचा कॉमन पासवर्ड असल्याचं निरिक्षणही त्यांनी नोंदवलं आहे. (Most of the time, many users use their name as a password)
चतुर हॅकर्सपासून आपली अकाऊंट सुरक्षित ठेवणं ही मोठी कसरतच आहे मात्र वरील पासवर्ड, स्वत:चं नाव ठेवणं शक्यतो युजर्सनं टाळावं असा सल्ला त्यांनी दिला आहे.
News English Summary: We use passwords to keep our social media accounts secure. But often these passwords are hacked and your confidential information is stolen. Therefore, it is often advised to avoid using certain letters or numbers in the password. But still some people make the same mistakes over and over again.
News English Title: Never use 123456 as password for security to protect for hackers news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL