पालघर-डहाणू : पालघर जिल्ह्यात अजून वरचेवर भूकंपाचे धक्के बसने सुरूच असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. कालच्या दिवसभरात भूकंपाचे ५ सौम्य धक्के जाणवले तसेच यामध्ये अनेक घरांना तडे गेल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, स्थानिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पिंपरी चिंचवडच्या सुदुंबरे येथून एनडीआरएफ’ची २ पथकं दाखल झाली आहेत. तशी गंभीर परिस्थिती ओढवल्यास स्थानिक नागरिकांनी नेमकी कोणती काळजी घेणे गरजेचे आहे, ते लोकांना सांगण्याचा प्रयत्न असेल. त्यासाठी २०० टेंट आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी लागणारी सामग्री सज्ज ठेवण्यात आली आहे. भीतीचे वातावरण असले तरी नागरिक खबदारीचा उपाय म्हणून तात्पुरते घर खाली करायला तयार नाहीत. तसेच ४० जवानांच्या तुकड्या सुद्धा सज्ज करण्यात आल्या आहेत.

earthquick at dahanu palghar today early morning