प्रदूषणाच्या प्रश्नावरून मनसे आ. राजू पाटील यांचा डोंबिवलीच्या जावयाला इशारा: सविस्तर वृत्त
डोंबिवली: औद्योगिक प्रदुषणाच्या विळख्यात अडकलेल्या डोंबिवली शहराचं नाव नेहमी चर्चेत असतं. कधी हिरवा पाऊस, नालातल्या घाणं पाणी तर आता चक्क गुलाबी रस्ता डोंबिवलीच्या रस्त्यांवर पाहायला मिळत आहे. इतकचं नाही तर या प्रदुषणामुळे गणेशोत्सवात गणपतीची मूर्तीही काळी पडल्याचं दिसून आलं. त्यामुळे पुन्हा एकदा डोंबिवली शहराच्या प्रदुषणाबाबत वादंग निर्माण झालं आहे.
या प्रकरणावर राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पर्यावरण विभागाकडे बोट दाखवत हात झटकण्याचं काम केलं आहे. यावरुन मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. डोंबिवलीकर प्रदूषणाच्या विळख्यात असताना मंत्र्यांनी जबाबदारी झटकणं हास्यास्पद आहे. आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ आणू नका, प्रदूषण कमी झालं नाही तर अधिकाऱ्यांना बांधून ठेवू असा इशारा कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना दिला आहे.
डोंबिवलीतील प्रदूषण रोखण्यासाठी योग्य ती कारवाई केली जावी ही माझीही मागणी आहे. हा विषय मी अनेकदा मांडला. पर्यावरण विभाग आणि विशेषकरुन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या अखात्यारित हा विषय येतो. जे प्रदूषण निर्माण करणारे कारखाने आहेत त्यांच्यावर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई झाली पाहिजे असं त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी ‘मला कोणतीही टीका करायची नाही. पण मुख्यमंत्री डोंबिवलीचे जावई आहेत. डोंबिवली शहरावर आता त्यांनी लक्ष द्यावे,’ असं म्हणत मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे घातले होते. प्रदुषणाला आणि अस्वच्छतेला जबाबदार असणाऱ्या एमआयडीसी, महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करत याबाबत राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलं होतं.
राज्याची सांस्कृतिक उपराजधानी अशी डोंबिवली शहराची ओळख होती. आता ही ओळख राहिली नसून हे शहर आता प्रदूषणाचे शहर म्हणून ओळखले जात आहे. या परिस्थितीला जबाबदार असणाऱ्या एमआयडीसी आणि महापालिका अधिकाऱ्यांवर तातडीने कडक कारवाई करावी अशी मागणी आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी केली होती.
‘केंद्रिय मंत्री नितिन गडकरी यांनीही वर्षांपूर्वी डोंबिवलीला बकाल शहर असे संबोधून देखील इथल्या महापालिका अधिकाऱ्यांनी त्या नाराजीच्या वक्तव्यातून कसलाच बोध घेतला नाही, ही या शहरांमधील नागरिकांची शोकांतिका असल्याचे पाटील राजू म्हणाले. एमआयडीसीच्या अस्वच्छता, नाले तुंबणे, कचऱ्याचे ढिग, दर्प याबाबत सातत्याने तक्रारी करण्यात येत असूनही यंत्रणा मात्र एकमेकांवर जबाबदारी ढकलून हात वर करत आहेत. त्यामुळेच इतर संस्थांना पुढे येऊन नालेसफाई करावी लागत आहे, असं म्हणत राजू पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.
‘या ठिकाणी बहुतांशी भाग उद्योग, निवासी असा आहे. त्यामुळे नागरिकांना श्वसनाचे आजार बळावत आहेत. तसेच कामगारांच्या स्वास्थाचा प्रश्न जैसे थेच असून तो दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या सर्व बकालीला आणि प्रदूषणाला येथील दोन्ही यंत्रणांचे अकार्यक्षम अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यासाठी अभियंते, प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी, महापालिकेचे स्वच्छता अधिकारी आदी सगळयांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर निलंबनासह कठोर कारवाई करावी असे पत्रात म्हटले होते.
एकूणच, मुख्यमंत्री शिवसेनेचे असल्याने ते मनसेच्या विषयांना बगल देत असून त्यामुळे डोंबिवलीचे सामान्य नागरिक मात्र प्रदूषणाने नरक यातना भोगत आहेत याची त्यांना जाणीव नसावी असं स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांची धारणा झाली आहे.
Web Title: If pollution Dombivli City will not reduced we will bind officers MNS MLA Raju Patil warning to Thackeray government.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Multani Mitti Face Pack | तुमचा 'हा' स्किन टाईप असल्यास कधीही मुलतानी मातीचा वापर करू नका, तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? - Marathi News
- Bigg Boss Marathi | दोघींची मैत्री 4 दिवस सुद्धा नाही टिकली; आर्या आणि जानवीची पुन्हा एकदा खडाजंगी - Marathi News
- True Beauty | रेडियंट ग्लो मिळवण्यासाठी फॉलो करा अभिनेत्री शरवरी वाघच्या ब्युटी टिप्स, चेहऱ्यावर वेगळेच तेज येईल
- Business Idea | बेकरी व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी! या तरुणीने उभारला मोठ्या उद्योग, तुमची सुद्धा सुरु करा
- Reliance Share Price | रिलायन्स शेअरने दिला 547% परतावा, पुढेही मालामाल करणार हा शेअर - Maharashtranama Marathi
- Bigg Boss Marathi | संग्रामची अरबाजला ताकदीची धमकी; दोन बॉडी-बिल्डरची आपापसात झुंज, प्रोमो पाहिलात का?
- Devara Part 1 Movie | आता फक्त 'देवरा पार्ट 1' सिनेमाची चर्चा; एका तासात गाठला 10 मिलियन व्ह्यूजचा आकडा
- Post Office Scheme | तुमच्या मुलींसाठी फायद्याची स्कीम; 10 हजार गुंतवा आणि 37 लाख रुपये मिळवा, फायदा घ्या - Marathi News
- Body Fat Percentage | नियमित डायट फॉलो करूनही पोटावरची चरबी कमी होत नाही? गंभीर कारण नोट करा - Marathi News