15 December 2024 12:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा
x

ना खाऊंगा ना खाणे दूंगा! लाचखोर भाजप नगरसेविकेला कोर्टाकडून ५ वर्षांचा कारावास

BJP Corporator Varsha Bhanushali, PM Narendra Modi

मीरारोड: मीरा भाईंदर महापालिकेतील भारतीय जनता पक्षाची लाचखोर नगरसेविका वर्षा गिरीधर भानुशाली हिला लाच प्रकरणी ठाणे कोर्टाने ५ वर्ष कैद आणि ५ लाख दंडाची शिक्षा ठोठावली आहे. भाजप नगरसेविका वर्षा भानुशाली लाचप्रकारणी ५ वर्षांचा कारावास आणि ५ लाख दंड अशी शिक्षा असून दंड न भरल्यास आणखी ६ महिन्याचा कारावास भोगावा लागेल.

भाईंदर पूर्वेकडील रेल्वे फाटकाजवळील विनोकेम्प इंडस्ट्रियल एस्टेटमध्ये राधा हर्षल पटेल यांचे १९७८ पासून पाच गाळे आहेत. त्यात बफिंगचे काम चालते. गाळा दुरु स्तीसाठी राधा पटेल यांनी २३ ऑगस्ट २०१३ ला महापालिकेत अर्ज केला होता. त्यानुसार महिन्यापूर्वी त्यांना परवानगी देण्यात आली होती.

परंतु ही परवानगी दुरु स्तीसाठी आहे, उंची वाढविण्यासाठी नाही,असे सांगून भानुशाली यांनी त्यांचे काम करण्यासाठी पैशांची मागणी केली होती. त्यावरून राधा पटेल यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याआधारे पोलीस निरीक्षक अशोक साळवे यांनी भानुशाली यांना अटक केली होती.

 

Web Title: Mira Bhayandar Municipal Corporation BJP Corporator Varsha Bhanushali sentenced Five Years Imprisonment from Court

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x