20 September 2024 5:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | L&T कंपनीची ऑर्डर बुक मजबूत झाली, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, फायद्याची अपडेट - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? - Marathi News Smart Investment | सरकारी योजनेत अवघ्या 200 रुपयांची बचत, मिळेल 28 लाख रुपयांपर्यंत परतावा, फायदा घ्या - Marathi News EPFO Login | पगारदारांनो, दरमहा एवढी EPF गुंतवणूक करा; मिळेल 3 ते 5 कोटींचा EPF फंड, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत नवीन अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, फायदा घ्या - Marathi News BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर BUY करावा की Sell - Marathi News
x

डोंबिवली: आ. राजू पाटील यांचं शहरातील प्रदूषण व अस्वच्छतेच्या विषयावरून मुख्यमंत्र्यांना पत्र

CM Uddhav Thackeray, Dombivali, Kalyan Gramin

डोंबिवली: ‘मला कोणतीही टीका करायची नाही. पण मुख्यमंत्री डोंबिवलीचे जावई आहेत. डोंबिवली शहरावर आता त्यांनी लक्ष द्यावे,’ असं म्हणत मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे घातले आहे. प्रदुषणाला आणि अस्वच्छतेला जबाबदार असणाऱ्या एमआयडीसी, महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करत याबाबत राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलं आहे.

राज्याची सांस्कृतिक उपराजधानी अशी डोंबिवली शहराची ओळख होती. आता ही ओळख राहिली नसून हे शहर आता प्रदूषणाचे शहर म्हणून ओळखले जात आहे. या परिस्थितीला जबाबदार असणाऱ्या एमआयडीसी आणि महापालिका अधिकाऱ्यांवर तातडीने कडक कारवाई करावी अशी मागणी आमदार प्रमोद(राजू) पाटील यांनी केली आहे.

‘केंद्रिय मंत्री नितिन गडकरी यांनीही काही वर्षांपूर्वी डोंबिवलीला बकाल शहर असे संबोधून देखील इथल्या महापालिका अधिकाऱ्यांनी त्या नाराजीच्या वक्तव्यातून कसलाच बोध घेतला नाही, ही या शहरांमधील नागरिकांची शोकांतिका असल्याचे पाटील राजू म्हणाले. एमआयडीसीच्या अस्वच्छता, नाले तुंबणे, कचऱ्याचे ढिग, दर्प याबाबत सातत्याने तक्रारी करण्यात येत असूनही यंत्रणा मात्र एकमेकांवर जबाबदारी ढकलून हात वर करत आहेत. त्यामुळेच इतर संस्थांना पुढे येऊन नालेसफाई करावी लागत आहे, असं म्हणत राजू पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

‘या ठिकाणी बहुतांशी भाग उद्योग, निवासी असा आहे. त्यामुळे नागरिकांना श्वसनाचे आजार बळावत आहेत. तसेच कामगारांच्या स्वास्थाचा प्रश्न जैसे थेच असून तो दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या सर्व बकालीला आणि प्रदूषणाला येथील दोन्ही यंत्रणांचे अकार्यक्षम अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. त्यासाठी अभियंते, प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी, महापालिकेचे स्वच्छता अधिकारी आदी सगळयांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर निलंबनासह कठोर कारवाई करावी असे पत्रात म्हटले आहे.

तत्पूर्वी, आमदार राजू पाटील यांनी कल्याण-डोंबिवली मधील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या अनेक विकास कामांना हात घातला आहे आणि ते तडीस घेऊन जाण्यास प्रशासकीय पातळीवर मोठी धावपळ करताना दिसत आहेत. त्यासाठी कल्याण डोंबिवलीतील मनसेची संपूर्ण टीम त्यांच्यासोबत पाठपुरावा करताना दिसत आहे. आमदार राजू पाटील यांनी पाठपुरावा घेतलेल्या अजून एका महत्वाच्या कामाला प्रशासन पातळीवर गती मिळाली आहे.

कल्याण रेल्वेस्थानक ते लोकग्रामला जोडणारा पादचारी पूल मागील काही महिन्यांपासून बंद करण्यात आला आहे. सदर पूल महापालिकेच्या स्मार्टसिटी प्रकल्पाअंतर्गत उभारला जाणार आहे. या पुलासंदर्भात महापालिका, स्मार्टसिटीचे अधिकारी आणि रेल्वेप्रशासन यांची आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितीत एक संयुक्त बैठक घेऊन त्यावर निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा केला होता आणि त्याला आता अंतिम स्वरूप प्राप्त झालं आहे. कारण या पुलाच्या उभारणीसाठी एकूण ३८ कोटी ५७ लाख निधी मजूर करण्यात आल्याने स्थानिक लोकांची मोठी मागणी पूर्णत्वाला येणार आहे.

 

Web Title:  MNS MLA Raju Patil wrote a letter to CM Uddhav Thackeray over Dombivali Pollution issue.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x