मुंबई: पुणे येथील एमटी विभागात डीआयजी पदावर होते असलेले डीआयजी निशिकांत मोरे यांचे अखेर गुहा विभागाने निलंबन केले आहे. विनयभंगाचा आरोप असणारे डीआयजी निशिकांत मोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आजच फेटाळण्यात आल्यानंतर गृह विभागाने ही मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात पीडित अल्पवयीन मुलीने विनयभंगाचा आरोप केल्याने तळोजा पोलीस ठाण्यात पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नवी मुंबईत डीआयजी निशिकांत मोरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसापूर्वी घरात चिठ्ठी लिहून बेपत्ता झालेली पीडित मुलगी अजून सापडली नाही. याप्रकरणी मोरे यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यानंतर राज्याच्या पोलीस महासंचालकांनीही लगेच निलंबनाची कारवाई केली.

उद्धव ठाकरेंकडे ड्रायव्हर असल्याचा दावा करणाऱ्या दिनकर साळवेने या अल्पवयीन मुलीच्या वडिलांना पनवेल कोर्टातच धमकवलं, असा आरोप तिच्या पालकांनी केला होता. पालकांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली.

पीडित मुलगीही सुसाईड नोट लिहून घरातून बेपत्ता झाल्याची कुटुंबियांची माहिती आहे. मात्र अल्पवयीन मुलगी तिच्या मित्रासोबत गायब झाल्याचा दावा आरोपी मोरेंच्यावतीनं कोर्टात करण्यात आला आहे. मोरे यांच्या पत्नीसोबत पीडितेच्या कुटुंबियांचे आर्थिक व्यवहार फिसकटल्यानं मोरेंविरोधात खोटी तक्रार दाखल केल्याचा दावा त्यांनी केला आहे. मोरे यांनी पीडितेच्या कुटुंबियांविरोधात आर्थिक फसवणुकीची तक्रार दिलेली आहे. या प्रकरणी दाखल गुन्ह्यात पीडितेचे कुटुंबिय जामिनावर बाहेर आहे.

 

Web Title:  Navi Mumbai dig Nishikant More suspended by Home Department for molesting juvenile after bail rejected.

विनयभंग करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं अखेर निलंबन; राज्य सरकारचा निर्णय