28 April 2024 7:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

Sam Dsouza Secrets | बाजूला बसलेला सॅम डिसोझा नेते, IAS-IPS-NCB अधिकाऱ्यांसाठी मनी लाँड्रिंगचं काम करतो - राऊत

Sam Dsouza Secrets

मुंबई, 25 ऑक्टोबर | एनसीबीच्या धाडप्रकरणात प्रभाकर साईल या साक्षीदाराने केलेल्या गौप्यस्फोटानंतर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी थेट भाजपलाच इशारा दिला आहे. मला धमक्या देऊ नका. नवाब मलिकांनी या प्रकरणात इंटरव्हलपर्यंतची गोष्ट सांगितली. इंटरव्हलनंतरची गोष्ट मी सांगेन, असं सांगत राऊतांनी भाजप नेत्याचे व्हिडीओही समोर आणण्याचा (Sam Dsouza Secrets) इशारा दिला आहे.

Sam Dsouza Secrets. I would like to tell the ED that money laundering has taken place in this case as well. I shared a video. In which one person is seen sitting on the side, it is Sam D’Souza. He is a player in the game of money laundering said Sanjay Raut :

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रभाकर साईलने केलेल्या गौप्यस्फोटाबद्दल त्याचं कौतुक केलं. ‘महत्त्वाचा साक्षीदार आहे, ही गोष्ट मला हे माहिती आहे. हे संपूर्ण प्रकरण षडयंत्र आणि पैशाचा खेळ आहे. मी ईडीला सांगू ईच्छितो की, या प्रकरणातही मनी लाँड्रिंग झालं आहे. मी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात एक व्यक्ती बाजूला बसलेली दिसत आहे, तो सॅम डिसोझा. तो मनी लाँड्रिंगच्या खेळातील खेळाडू आहे.’

‘सॅम डिसोझा नेते, मोठे पोलीस अधिकारी, आयएएस, आयपीएस, एनसीबी यांचं मनी लाँड्रिंग करण्याचं काम करतो, असं त्यांच्याविषयी बोललं जातं. तो तिथे बसलेला दिसत आहे. का बसलेला आहे. त्यामुळे हा खूप मोठा खेळ आहे आणि तो सुरू झाला आहे’, असं राऊत यांनी सांगितलं.

राऊत म्हणाले, प्रभाकर म्हणून जो साक्षीदार आहे, तर त्याला काहीच करू शकणार नाही. प्रयत्न तर होईल. कारण याचे धागेदोरे मुंबई नाही, तर दिल्लीपर्यंत पोहोचणार आहेत. त्याने जो खुलासा केला आहे, तो करून त्याने देशावर खूप उपकार केले आहेत. अशा लोकांना उघडं पाडणं हीच देशभक्ती आहे.’

‘खंडणी गोळा करून परदेशात पाठवतात आणि स्वतःला देशभक्त म्हणवून घेतात. त्यांचं समर्थन करणारा जो पक्ष आहे, ते तर सगळ्यात मोठे देशद्रोही लोक आहेत. जे काही सुरू आहे, त्यातील लोकांचं भजन करणारे. आता बऱ्याच गोष्टी समोर येतील. आतापर्यंत नवाब मलिक यांनी समोर आणलं आहे. आता इंटरव्हलनंतरची गोष्ट आता मी तुम्हाला सांगणार आहे’, असं म्हणत राऊतांनी सस्पेन्स वाढवला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Sam Dsouza Secrets He is a player in the game of money laundering said Sanjay Raut.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x