29 April 2024 1:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार? Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक
x

नवाब मलिकांच्या कुटुंबीयांकडून अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांकडून जमीन खरेदी - देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis

मुंबई, 09 नोव्हेंबर | मुंबईतल्या कुर्ला भागात LBS रोडवर जवळपास तीन एकर जागा आहे. एका गोडाऊनवाल्या कुटुंबाची ही जागा होती. अत्यंत महागडी ही जागा होती. त्याची एक पॉवर ऑफ अॅटर्नी सलीम पटेल आणि शाहवली खान यांच्याकडे होती. या दोघांनी एलबीएस रोडवरची ही जागा सॉलिडस नावाच्या एका कंपनीला विकली आहे. सॉलिडस कंपनीच्या वतीने या कागदावर सही केली आहे ती फराज मलिक यांनी. ही कंपनी नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांची आहे. असा आरोप आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे.

Devendra Fadnavis. The duo has sold the land on LBS Road to a company called Solidus. The document was signed by Faraz Malik on behalf of Solidus Company. This company belongs to the family of Nawab Malik says Devendra Fadnavis :

स्वतः नवाब मलिकही काही काळासाठी या कंपनीत संचालक होते. शाहवली खान आणि सलीम पटेल या दोघांनी सॉलिडसला ही जागा फक्त 30 लाखांत विकली आहे. त्यातले 20 लाखच दिले आहेत. मला जी माहिती आहे त्यानुसार भाडे तत्त्वावर ही जागा दिली असेल त्यातून सॉलिडसला एक कोटी रूपये भाडं मिळतं आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

2005 मध्ये जो व्यवहार झाला त्यावेळी तिथला दर काय होता? तर त्याच्या मागे पाईपलाईनच्या कच्च्या रोडवर 415 रूपये स्क्वेअर फूटने जागा घेतली ती मलिक कुटुंबाने घेतली होती. याच रोडवर एक जागा 2005 मध्ये एक जागा 2 हजार रूपये स्क्वेअर फूटने विकत घेतली आहे. सॉलिडसने याच वर्षी दोन अंडरवर्ल्डच्या लोकांकडून ही जमीन 25 रूपये स्क्वेअर फूटने घेतली आहे. मुंबईत उकिरड्याची जागाही 25 रूपये चौ. फुटाने घेतली असून 15 रूपये चौ. फुटाने पैसे दिले आहेत. आता प्रश्न हा आहे की मुंबईच्या गुन्हेगारांकडून ही जमीन का विकत घेतली गेली?

सरदार शहावली खान आणि सलीम पटेल कोण?
सरदार शहाबली खान हा 1993 चे गुन्हेगार आहेत. त्यांना जन्मठेप झाली आहे ते तुरुंगात आहेत. त्यांची शिक्षा सुप्रीम कोर्टानं कायम केली आहे. सरदार शहाबली खान याच्यावर टायगर मेमन याच्या नेतृत्त्वात मुंबई महापालिका आणि बॉम्बे स्टॉक एक्सेंजमध्ये बॉम्ब ठेवण्यासंदर्भात चर्चा झाली होती. टायगर मेमनच्या घरी बैठक झाली होती. टायगर मेमनच्या गाडीत आरडीएक्स भरलं गेलं त्यामध्ये सरदार शहाबली खानचा समावेश होता. सरकारी साक्षीदारांनतर त्यांना शिक्षा भोगावी लागत आहे.

सलीम पटेल हे व्यक्ती आहेत. आर.आर.पाटील एका इफ्तार पार्टीत गेले होते. त्यामध्ये आर.आर. पाटील यांचा दोष नव्हता. सलीम पटेल याच्यासोबत फोटो चालवला गेला होता. सलीम पटेल हा हसीना पारकरचा ड्रायव्हर होता. 2007 मध्ये हसीना पारकरला अटक झाल्यानंतर सलीम पटेलला अटक करण्यात आली होती. दाऊद फरार झाल्यानंतर हसीना पारकरच्या नावावर संपत्ती जमा करण्यात येत होती. सलीम पटेलच्या नावावर पॉवर ऑफ अटर्नी करण्यात येत होती, असा दावा फडणवीस यांनी केला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Devendra Fadnavis made serious allegations on minister Nawab Malik.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x