29 March 2024 11:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार? Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार? IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, या पातळीवर टिकल्यास अल्पावधीत उच्चांक किंमत स्पर्श करणार Mutual Fund SIP | मार्ग श्रीमंतीचा! या 10 म्युच्युअल फंड SIP दरवर्षी 40% ते 71% परतावा देतं आहेत, सेव्ह करा यादी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, ही योजना देईल मोठा व्याज दर
x

देवेंद्र फडणवीस हे मावळते मुख्यमंत्री: शिवसेना

Shivsena, Saamana Agralekh, Uddhav Thackeray, MP Sanjay Raut, CM Devendra Fadnavis

मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून बराच कालावधी लोटला असला तरी राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा मात्र सुटताना दिसत नाही. मुख्यमंत्रिपद असेल किंवा काही महत्त्वाची खाती असतील यावरून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामधील वाद अद्यापही सुटला नाही. भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्रिपद शिवसेनेला न देण्यावर ठाम आहे. तर दुसरीकडे शिवसेना अडीच अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद मिळवण्यावर ठाम आहे. अशातच दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहे. अशातच शिवसेनेने पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत ते मावळते मुख्यमंत्री असल्याचा उल्लेख केला आहे.

महाराष्ट्रात लवकरात लवकर नवे सरकार स्थापन होणे हे देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, तितकेच ते राज्याच्या मऱहाटी जनतेसाठी महत्त्वाचे आहे. पण सत्तास्थापनेचा घोळ घालायचा व त्या परिस्थितीचा लाभ घेऊन सरकार नसतानाही अप्रत्यक्ष सूत्रे हातात ठेवून राज्यकारभार हाकायचा हे घटनाविरोधी आहे. नवे राज्य मोकळय़ा वातावरणात यावे, पण एकदाचे राज्य यावे हीच अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या जनतेने ‘कौल’ दिला आहे. दिल्लीच्या गढूळ वातावरणातून मावळते मुख्यमंत्री महाराष्ट्रात उतरतील तेव्हा त्यांना पुढचे पाऊल टाकावेच लागेल. त्यांच्या पावलावरच राज्याची पुढची दिशा ठरेल असं शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे.

दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीला बहुमत मिळाल्यावर राज्यात सहज सरकार स्थापन करता येईल, असे गृहित धरलेल्या भारतीय जनता पक्षामध्ये सध्या कमालीची अस्वस्थता आहे. अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद व सत्तेतील समान वाटा या मागण्यांसाठी अडून बसलेल्या शिवसेनेने चर्चेचे दरवाजेच बंद केल्याने सर्वात मोठा पक्ष असूनही भारतीय जनता पक्षाच जात्यात आला आहे. त्यातच युतीचे सरकार स्थापन झाले तरी, महसूल, सार्वजनिक बांधकाम, अर्थ अशी महत्त्वाची खाती शिवसेनेला द्यावी लागणार असल्याने भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते नाराजीचा सूर काढत आहेत.

शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद दिले नाही, तरी इतर काही महत्त्वाची खाती मात्र भारतीय जनता पक्षाला सोडावीच लागणार आहेत. नगरविकास आणि गृह हे विभाग मुख्यमंत्र्यांकडे राहतील. महसूल, अर्थ, सार्वजनिक बांधकाम आदी खाती शिवसेनेकडे गेली, तर भाजपच्या वरिष्ठ मंत्र्यांना कमी दर्जाच्या खात्यांवर समाधान मानावे लागेल, असा सूर भारतीय जनता पक्षामध्ये निघत आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x