मुंबई : यंदाच्या नवरात्रौत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. नवरात्रींच्या ९ दिवस नऊ रंग आणि ९ रुप घेऊन दुर्गा माता अवतरणार आहे. आज घटस्थापनेचा दिवस असल्याने आजच पहिली माळ घालण्यात येते. त्यामुळे आज पहाटेपासूनच राज्यभरात देवींच्या मंदिरात भाविक भक्तांनी अलोट गर्दी केली आहे. महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजाभवानी आणि कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात भक्तांची तुफान गर्दी दिसून येत आहे. या दोन्ही मंदिरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

आज पहिल्या माळेला देवीने निळा रंग परिधान केला आहे. शक्ती आणि श्रेष्ठतेचे प्रतिक असलेल्या या रंगाने नवरात्रौत्सवाची सुरूवात झाली आहे. त्यामुळे आज निळ्या रंगाचे कपडे परिधान करुन दुर्गामातेची पूजा करण्यात येत आहे. तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात प्रत्येक तासाला ६ हजार भाविकांचे दर्शन होईल, अशी व्यवस्था राबविण्यात आली आहे. तर गर्दी आणि दर्शनाचा ताळमेळ राखण्यासाठी दीड तास मंदिर बंद ठेवण्याचाही निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.

today is the first day navardutra uatsav and todays color is blue