3 May 2024 2:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

व्हिडिओ: BMC एल वॉर्डवर मनसेचा मोर्चा, नगरसेवक तुर्डे यांच्यासाठी मनसे मैदानात

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील मनसेचे नगरसेवक संजय तुर्डे यांच्या वॉर्डात विकास कामं होऊ देत नसल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माणसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते सर्वच मैदानात उतरले होते. पालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी कुर्ल्यातलं एल वॉर्ड ऑफिस गाठलं. याआधी ज्या कंत्राटदाराला मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक संजय तुर्डे यांना ५५ दिवस जेलमध्ये राहावे लागले होते आणि त्या कंत्राटदाराला स्थायी समितीची परवानगी नसताना सुद्धा तो कशी काय मुंबई महापालिकेची कामं करु शकतो, असा सवाल पक्षाच्या नेतेमंडळींनी विचारला.

त्यात मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी नेहमीच्या आक्रमक शैलीत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले तर माजी आमदार आणि पक्षाचे वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी सुद्धा अधिकाऱ्यांना शिस्तीत जाब विचारला. बैठकीत एका बाजूला संदीप देशपांडे आक्रमकपणे अधिकाऱ्यांना धारेवर घेत होते तर दुसरीकडे बाळा नांदगावकर संयमाने अधिकाऱ्यांना फैलावर घेताना दिसले.

मुंबई महापालिकेतील नगरसेवकांना कोणत्या कामासाठी निधी दिला जाऊ शकतो याचं उत्तर देण्यासाठी १५ दिवसांची मुदत मनपा अधिका-यांनी मागितली. दरम्यान, नगरसेवक संजय तुर्डे यांच्यासाठी संपूर्ण पक्षच मैदानात उतरल्याने पालिकेच्या अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झालेली पाहायला मिळाली. सध्या मनसे सुद्धा सामान्यांच्या प्रश्नांवर आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे आणि त्यातून सत्ताधारी शिवसेनेची सुद्धा अप्रत्यक्ष राजकीय अडचण होत आहे, असं एकूण चित्र आहे.

व्हिडिओ : नेमकं कसं धारेवर धरण्यात आलं अधिकाऱ्यांना?

हॅशटॅग्स

MNS(95)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x