6 May 2024 11:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषींना पकडण्यासाठी अमेरिकेकडून ३५ कोटींचं बक्षीस

मुंबई : आज मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला तब्बल १० वर्षे पूर्ण होत असली तरी या हल्ल्यामागील खऱ्या सूत्रधार तसेच दोषींवर कारवाई न होणे म्हणजे पीडितांचा अपमानच म्हणावा लागेल. युनो’च्या सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावानुसार या हल्ल्याचे षडयंत्र रचणारे खरे सुत्रधार हाफिज सईद आणि जाकीउर रहमान लखवी यांना शिक्षा देणे ही पाकिस्तान सरकारची मुख्य जबाबदारी आहे, अशी मागणी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी केली आहे. तसेच या दोन्ही आरोपींना जेरबंद करण्यासाठी बक्षिसा सुद्धा अमेरिकेकडून मोठी वाढ करण्यात आली असून ती तब्बल ३५ कोटी इतकी करण्यात आली आहे.

दरम्यान, याच दिवशी म्हणजे २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण जगाला धक्का बसला होता. आज त्याच घटनेला दहा वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी अमेरिकण सरकारच्यावतीने भावना व्यक्त केल्या आहेत. पोम्पिओ म्हणाले की, “मुंबई हल्ल्याच्या दशवर्षपूर्तीनिमित्त मी अमेरिका तसेच सर्व अमेरिकन नागरिकांच्यावतीने मुंबईकरांना बळ मिळावे अशी भावना व्यक्त करतो.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x