29 April 2024 7:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

नाशिक'मध्ये राज ठाकरेंना भेटायला तुफान गर्दी, शेतकऱ्यांसोबत सुद्धा संवाद

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांच्या नाशिक दौऱ्यात त्यांनी नाशिक ग्रामीणकडे मोर्चा वळवल्याचे निदर्शनास येते आहे. त्यानिमित्त दिंडोरीत त्यांनी शेतकऱ्यांच्या भेटीगाठी सुद्धा घेतल्याचे समजते. सत्ताकाळात नाशिक’मध्ये मोठ्या प्रमाणावर विकासाची आणि मूलभूत सुविधांची कामं करून सुद्धा पक्षाला महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत अपयश आलं होतं. त्याच मूळ कारण होतं ते, मुख्यमंत्र्यानी नाशिकच्या जनतेला दाखवलेलं विकासाचं स्वप्नं आणि केंद्रात, राज्यात तसेच महापालिकेत भाजपचं सरकार असेल तर विकास खूप जलद होईल असा दिलेला विश्वास.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये काहीच विकास केला नसून, उलट मनसेने राबविलेले लोकउपयोगी प्रकल्प सुद्धा बंद पडले होते. पायाभूत सुविधांमध्ये सुद्धा जैसे थे परिस्थिती आहे. त्याउलट स्मार्ट सिटीच्या नावाने मनसेच्या सत्ताकाळातील प्रकल्प स्मार्ट सिटीत दाखवून नाशिकरांना मूर्ख बनवण्याचे प्रयोग केले गेले. त्यामुळे भाजपाच्या प्रत्यक्ष सत्ताकाळाचा आलेला अनुभव हा सामान्य जनतेचा भ्रमनिरास करणारा ठरला आहे. त्यामुळे राज ठाकरेंकडे पुन्हा नाशिकरांचा ओघ वाढण्याची शक्यता अधिक आहे.

राज ठाकरे यांनी ग्रामीण नाशिकवर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. या दौऱ्यात ते अनेक शेतकरी तसेच शेतकरी संघटनांना भेटणार असल्याचे समजते. मराठवाड्यात सुद्धा मनसेने शेतकऱ्यांसाठी दंडुका मोर्चाचे आयोजन केले होते, ज्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता उत्तर महाराष्ट्रात सुद्धा राज ठाकरे यांनी विशेष लक्ष केंद्रित करण्याचा निश्चय केलेला दिसतो. त्यासाठी या दौऱ्यादरम्यान पक्ष विस्तारासोबत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बळकट फळी उभी करण्यावर ते अधिक भर देणार असल्याचे समजते.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x